वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालयातील वनस्पती रोगशास्त्र विभागात
भारतीय कृषि संशोधन परिषद यांच्या
अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आळंबी (मशरूम) उत्पादन, ट्रायकोडर्मा निर्मिती व जैविक विघटन उत्पादन
या विषयांवर आधारित तीन दिवसीय कौशल्यवर्धक प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक ११ ते १३ फेब्रुवारी
२०२६ या कालावधीत करण्यात आले.
या प्रशिक्षण
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य तसेच वनस्पती
रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रफुल घंटे हे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षीय
भाषणात माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि सांगितले की, आधुनिक शेतीत केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न
राहता कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पूरक व्यवसाय स्वीकारणे काळाची गरज
आहे. आळंबी उत्पादन, ट्रायकोडर्मा व जैविक विघटकांची
निर्मिती हे पर्यावरणपूरक व उत्पन्नवर्धक व्यवसाय असून शेतकरी, युवक व महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
या
प्रशिक्षणात आळंबी उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया,
ट्रायकोडर्मा निर्मितीचे तंत्रज्ञान, जैविक
विघटकांचा शेतीत वापर, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीतील उपयोग, उत्पादन खर्च, बाजारपेठेतील संधी तसेच स्वयंरोजगार निर्मिती याबाबत सखोल मार्गदर्शन
करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे प्रत्यक्ष अनुभव देण्यात
आला.
कार्यक्रमाच्या
शेवटी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या
उपक्रमामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांना कौशल्याधारित स्वयंरोजगाराच्या
नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास
आयोजकांनी व्यक्त केला.


