वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी
मंदिरात विद्यापीठ तसेच राज्यातील शेतकरी बांधवांच्या शांती, समृद्धी व संपन्नतेसाठी भावपूर्ण पूजाअर्चा केली.
या प्रसंगी माननीय कुलगुरू यांच्यासमवेत नवी दिल्ली येथील भारतीय कृषि
अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे
जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र
कुमार सिंह हे उपस्थित होते. या पूजनप्रसंगी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने
माननीय कुलगुरू यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
देवीचे दर्शन घेताना माननीय कुलगुरूंनी “शेतकरी देवो भवः” या भावनेचा
उच्चार करत, कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वांगीण
विकासासाठी सातत्याने व समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
त्यांनी तुळजाभवानी मातेकडे विद्यापीठ, संशोधक, विद्यार्थी तसेच सर्व शेतकरी बांधवांच्या आरोग्य, प्रगती
व कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली.
या पूजाअर्चेच्या माध्यमातून शेतकरी सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा
प्रभावी प्रसार तसेच नव्या कल्पनांच्या आधारे ग्रामीण भारताच्या सर्वांगीण
विकासाचा संदेश देण्यात आला.
यावेळी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे, सहाय्यक प्राध्यापक
डॉ. किरण थोरात, डॉ. भगवान अरबाड यांच्यासह अन्य मान्यवर
उपस्थित होते.

.jpeg)