वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि
अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित “शाश्वत कृषिसाठी वनस्पती
मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations
in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable
Agriculture) या विषयावरील २१ दिवसीय हिवाळी शाळेचे उद्घाटन माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या
कार्यक्रमास ICAR, नवी दिल्ली येथील सहसंचालक (मानव संसाधन
विकास) डॉ. सीमा जग्गी (ऑनलाईन), शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर
तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षण
कार्यक्रमात कर्नाटक,
तेलंगणा, केरळ, राजस्थान,
छत्तीसगड आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी
सहभागी झाले आहेत. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
मार्गदर्शनानुसार व अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रशिक्षणार्थ्यांसाठी विद्यापीठातील
विविध संशोधन केंद्रे व उद्योगांना शैक्षणिक भेटींचे आयोजन करण्यात आले.
दिनांक २८
फेब्रुवारी रोजी नाहेप (NAHEP)
केंद्र येथे डॉ. गोपाळ शिंदे यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर १ मार्च रोजी विद्यापीठाच्या उती संवर्धन केंद्रास भेट देऊन केंद्राचे
प्रभारी अधिकारी डॉ. कुलदीप शर्मा व वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. राजकुमार वाडीकर
यांनी रोगमुक्त केळी रोपांच्या निर्मितीसाठी उती संवर्धन प्रक्रियेचे
प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
दिनांक २ मार्च रोजी
दिवशी रेशीम संशोधन केंद्रास भेट देऊन प्रभारी अधिकारी डॉ. धीरज कदम, डॉ.
संजय बोकन व डॉ. धनंजय मोहोड यांनी रेशीम उत्पादन प्रक्रियेची माहिती दिली. तसेच
अन्न तंत्र महाविद्यालयातील कॉमन इन्क्युबेशन सेंटर अंतर्गत उभारण्यात आलेल्या गुळ
उत्पादन केंद्रास भेट देण्यात आली. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर
यांनी उद्योजकता विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले, तर
डॉ. कैलास गाढे यांनी बेकरी उत्पादनातील संधींबाबत माहिती दिली.
या सर्व भेटी
दरम्यान विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ.
गजेंद्र जगताप आणि उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.
या २१ दिवसीय हिवाळी शाळेमुळे वनस्पती मायक्रोबायोम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत शेतीस चालना मिळणार असून संशोधक व प्रशिक्षणार्थींना आधुनिक जैव-इनपुट्स संवर्धन तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान प्राप्त होणार आहे..


.jpeg)
.jpeg)












