Thursday, March 5, 2026

वनामकृवित जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि माय भारत, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ मार्च २०२६ रोजी १८ ते २५ वयोगटातील युवकांमध्ये सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांची विचारशक्ती व निर्णयक्षमता विकसित करणे या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक त डॉ. भगवान आसेवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणीच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या डॉ. नीता गायकवाड उपस्थित होत्या.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. पंडित निर्मल, डॉ. कल्याण गांगुर्डे, डॉ. सुरेश भालेराव, डॉ. हर्षा सूर्यवंशी, डॉ. सुरेंद्र रोडगे आणि डॉ. धम्मपाल कांबळे यांनी काम पाहिले. परीक्षकांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे राज्यस्तरीय “विकसित भारत युवा संसद २०२६” साठी खालील विद्यार्थ्यांची निवड केली.

१. वैष्णवी एकनाथ शितळे – उद्यानविद्या महाविद्यालय, परभणी
२. गायत्री रंगनाथराव लाड – श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी
३. महेश गणेश लांगे – केकेएम महाविद्यालय, मानवत
४. अभिषेक सुरेश हिवराळे – कृषी महाविद्यालय, परभणी
५. शेजल श्रीकांत काळे – पी.डी. जैन होमिओपॅथिक महाविद्यालय, परभणी

कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता वाढविण्यासह सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन करण्याची संधी मिळाली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.