वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी जिवा प्रकल्पांतर्गत बाबुळगाव – गंगणबीड (ता. कंधार, जिल्हा नांदेड)
जलसंधारण क्षेत्राला दिनांक २५ मार्च २०२६ रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी
बायो-इनपुट रिसोर्स सेंटर (BRC) चे
उद्घाटन केले तसेच शेतकरी व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत सुरू असलेल्या विविध
उपक्रमांची पाहणी केली.
या भेटीस पशुसंवर्धन यांत्रिकीकरण विभागाचे प्रभारी डॉ. दयानंद टेकाळे, मृदा विज्ञान विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार तसेच
आयसीएआर-एआयसीआरपी (युएई), आयसीएआर-सीआयएई, भोपाळचे माजी प्रकल्प समन्वयक डॉ. महाराणी दिन उपस्थित होते.
माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांचे प्रयत्न, संस्कृती संवर्धन मंडळाच्या पुढाकाराचे तसेच वॉसान (WASSAN) आणि आरआरए नेटवर्कच्या तांत्रिक सहकार्याचे कौतुक केले. नैसर्गिक शेती (NF) अंतर्गत सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या श्रीमती सुमन बोरोळे या महिला शेतकऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कापूस आधारित पीक विविधीकरण मॉडेलचे आर्थिक व कार्यप्रदर्शन मूल्यांकनासह सहभागात्मक पद्धतीने अभ्यास करणे, तसेच बायो-इनपुट रिसोर्स सेंटर (BRC) चे प्रणालीबद्ध मूल्यमापन करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण सूचनांचे त्यांनी स्वागत केले. नैसर्गिक शेतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी विद्यापीठ, राज्य शासन व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून बहु-घटक भागीदारी बळकट करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच प्रकल्पाच्या सामाजिक घटकांना अधिक बळकटी देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.






.jpeg)

