वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती
रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित “शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम
जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant
Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या विषयावरील २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (हिवाळी शाळा) दिनांक २८
फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे.
या प्रशिक्षण
कार्यक्रमात कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड व
महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून वनस्पती
मायक्रोबायोम, जैव-इनपुट्स तंत्रज्ञान, शाश्वत शेती व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषितंत्रज्ञान याबाबत सखोल प्रशिक्षण
दिले जात आहे.
माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली व अभ्यासक्रमाचा एक भाग
म्हणून दिनांक १२ मार्च २०२६ रोजी प्रशिक्षणार्थ्यांसाठी विद्यापीठातील विविध
संशोधन केंद्रे तसेच मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील करडई बीजोत्पादन प्रक्षेत्रास
शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांनी विद्यापीठात
चालू असलेल्या संशोधन व प्रात्यक्षिक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
भेटीदरम्यान
सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, वनस्पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील
तसेच करडई संशोधन केंद्राचे करडई पैदासकार व प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल
यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सेंद्रीय शेती, जैव-इनपुट्सचा
वापर, करडई पिकाचे सुधारित तंत्रज्ञान तसेच प्रक्षेत्रावर
राबविण्यात येणारे विविध संशोधन व प्रात्यक्षिक उपक्रम याविषयी सविस्तर माहिती
दिली.
याबरोबरच महाराष्ट्र
मॅकनायझेशन सेंटरचे प्रभारी अधिकारी श्री. संजय मोरे, तांत्रिक अधिकारी इंजि. शिवानंद शिवपुजे व
इंजि. गजानन खिस्ते यांनी कृषी यंत्रसामग्रीच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
ट्रॅक्टरची निगा व देखभाल, लहान-मोठ्या दुरुस्तीची तंत्रे,
ट्रॅक्टर चालवताना घ्यावयाची काळजी तसेच यंत्रसामग्रीची कार्यक्षमता
वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. याशिवाय रुंद वरंबा-सरी
टोकण यंत्र, ट्रॅक्टरचलित नांगर तसेच कृषी क्षेत्रात ड्रोन
तंत्रज्ञानाचा वापर याबाबतही प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन
करण्यात आले.
या शैक्षणिक
भेटीमुळे प्रशिक्षणार्थ्यांना संशोधन,
प्रात्यक्षिक व आधुनिक कृषितंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळाली
असून शाश्वत शेतीसाठी मायक्रोबायोम व जैव-इनपुट्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा
करता येईल याबाबत उपयुक्त मार्गदर्शन लाभले.


.jpeg)






.jpeg)
.jpeg)