वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत आंबेजोगाई येथील सीताफळ
संशोधन केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २६ मार्च
२०२६ रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठ उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे तसेच प्रभारी
अधिकारी डॉ. गोविंद मुंडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य
डॉ. मधुकर खळगे उपस्थित होते.
भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी केंद्रातील विविध विकासकामांचा आढावा घेत
संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सीताफळ संशोधन केंद्रासाठी
प्रस्तावित नवीन इमारतीचे काम गतीने पूर्ण करावे, तसेच जवळील शेततळ्यातील गाळ (सिल्ट) आणून मृदा सुपीकता वाढवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
केंद्र परिसरात माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित
करण्याचे, वन विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण
करून अतिक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे तसेच केंद्रातील तालुका बीज गुणन केंद्राच्या
प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यासाठी नाहरकत मिळविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे
निर्देशही त्यांनी दिले.
याशिवाय सीताफळ प्रक्रिया केंद्रातील अपूर्ण कामे येत्या १४ एप्रिलपूर्वी
पूर्ण करावीत, असे सांगून प्रक्रिया युनिटमधील
उपकरणांची पाहणी केली. या उपकरणांद्वारे सीताफळ पल्पपासून कुल्फी, रबडी आणि आईस्क्रीम तयार करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले
असल्याची माहिती माननीय कुलगुरूना प्रभारी अधिकारी यांनी यावेळी दिली.
या भेटीतून सीताफळ संशोधन व मूल्यवर्धनाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

.jpeg)