वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत
आंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहास माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २६ मार्च २०२६ रोजी भेट दिली.
यावेळी माननीय
कुलगुरूंनी मुलींच्या वस्तीगृहातील विविध सोयी-सुविधांची सखोल पाहणी करून
विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा तातडीने
करण्यावर भर दिला. विद्यार्थिनींना सुरक्षित,
स्वच्छ व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कॅन्टीनची
अद्ययावत व सुसज्ज व्यवस्था निर्माण करावी तसेच आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक
सकाळच्या नाश्त्याची नियमित सोय करावी, अशा स्पष्ट सूचना
त्यांनी दिल्या.
यासोबतच
विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करून त्यांना नियमित
व्यायामाची सवय लागावी यासाठी स्वतंत्र व्यायामाची सुविधा निर्माण करावी अथवा
विद्यमान व्यायामशाळेत मुलींसाठी दररोज किमान दोन तास राखीव ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
दिले. तसेच वस्तीगृह परिसरात स्वच्छता, सुरक्षितता, पिण्याच्या पाण्याची शुद्ध व्यवस्था, प्रकाशयोजना
आणि आवश्यक देखभाल याकडे विशेष लक्ष देऊन विद्यार्थिनींना अनुकूल व सुरक्षित
वातावरण निर्माण करण्याचे निर्देश देत, त्यांच्या शैक्षणिक
प्रगतीसोबतच आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचा उद्देश त्यांनी
व्यक्त केला.
यावेळी
त्यांच्या समवेत विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठ उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे,
कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे, महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भानुदास बोंडे तसेच इतर कर्मचारी उपस्थित
होते.
.jpeg)
.jpeg)