भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याचे देशभरातील पात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने वितरण करण्यात आले.
या
कार्यक्रमाद्वारे देशभरातील ९ कोटी ३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १८ हजार ६४० कोटी
रुपयांहून अधिक सन्मान निधी थेट त्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आला. यावेळी
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
त्यांच्या प्रेरणादायी भाषणाचा लाभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि तसेच उपस्थित मान्यवरांनी थेट प्रक्षेपणाद्वारे घेतला.
या
महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत विद्यापीठाच्या सिम्पोजियम हॉल
(हॉल क्र. १८) येथे आयोजित करण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे
यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमास
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दौलत चव्हाण, उपसंचालक कृषी
श्री. स्वप्निल जाधवर, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे
व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे, डॉ संतोष फुलारी, आदी मान्यवरसह विद्यापीठातील आणि कृषि
विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास १२५ हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग
घेतला असून त्यामध्ये महिला शेतकऱ्यांचा मोठा वाटा होता.
या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या पीएम किसान योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला असून शेतकरी कल्याणाच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
.jpeg)



.jpeg)