तांत्रिक प्रात्यक्षिकातून कृषि अभियांत्रिकीतील भविष्यातील संधींची ओळख; उद्योग-सज्ज
विद्यार्थ्यांच्या घडणीस चालना
शैक्षणिक शिक्षण आणि औद्योगिक नवोपक्रम यांच्यातील दरी कमी करण्याच्या
उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि आणि जॉन डियर, पुणे येथील प्रतिनिधी दीपाली जाधव यांच्या संकल्पनेतून कृषि अभियांत्रिकी
व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे प्राध्यापक व
विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ‘जॉन डियर पॉवर अँड टेक्नॉलॉजी ७.०’ या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ मार्च २०२६ रोजी करण्यात
आले.
या तांत्रिक प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना कृषि अभियांत्रिकी
क्षेत्रातील भविष्यातील संधी व जागतिक बदलांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. आधुनिक
शेतीची आव्हाने पेलण्यासाठी सक्षम आणि ‘उद्योग-सज्ज’ व्यावसायिक तयार करण्याच्या
विद्यापीठाच्या ध्येयपूर्तीत हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, अशी भावना माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ.
राहुल रामटेके यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
जॉन डियर इंडियाच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित करण्यात आलेल्या
या कार्यक्रमात कृषि यंत्रसामग्रीतील अत्याधुनिक प्रगतीचे प्रभावी प्रदर्शन
करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रिमोट
सेन्सिंग (RS) तंत्रज्ञानाचा आधुनिक शेती उपकरणांमध्ये कसा
वापर केला जातो, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच
‘स्मार्ट कनेक्टेड मशीन’ आणि भारतीय शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी डिझाइन
केलेल्या उच्च-क्षमतेच्या नव्या यंत्रांचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. विवेकानंद भोसले, जॉन डियरचे
मार्केटिंग मॅनेजर इंजि. आशिष चौधरी, सिंचन व निचरा विभाग
प्रमुख डॉ. सुमंत जाधव, प्रशिक्षण समन्वयक डॉ. मधुकर मोरे
आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दत्तात्रय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व जॉन डियरमध्ये कार्यरत इंजि. कैलास
टाकळगव्हाणकर यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय पाटील यांनी केले, तर डॉ. अनिकेत वाईकर यांनी
उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. अनिकेत वाईकर,
डॉ. शैलजा देशवेना, डॉ. ओंकार गुप्ता, इंजि. अनिल हरकळ, इंजि. कौस्तुभ बणे आणि इंजि. विकास
यांनी विशेष परिश्रम घेतले.


.jpeg)