वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) – सिंचन
जल व्यवस्थापन विभाग आणि भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत
भारतीय जल व्यवस्थापन संस्थान (IIWM – Indian Institute of Water
Management) यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंचन
जल व्यवस्थापन” विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळा – २०२६ चे आयोजन दि. १ ते ३ जुलै
२०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. ही कार्यशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी येथे संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ दि. १ जुलै २०२६ रोजी
सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिंपोजियम हॉल येथे आयोजित
करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन विभागाचे (ICAR-NRM) उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक उपस्थित राहणार आहेत.
तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मृदा
व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन आणि भुवनेश्वर येथील
भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थानाचे संचालक डॉ.
ए. सारंगी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,
कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता
श्री. दीपक कशाळकर तसेच नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्यासह भारतीय कृषि
अनुसंधान परिषद आणि विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी व शास्त्रज्ञ कार्यक्रमास
उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत देशभरातील कृषि विद्यापीठे, संशोधन
संस्था तसेच अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत सिंचन जल व्यवस्थापन
केंद्रांतील शास्त्रज्ञ सहभागी होणार असून सिंचन जल व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, हवामान
बदलाच्या पार्श्वभूमीवरील जल नियोजन तसेच शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान या
विषयांवर चर्चा व अनुभवांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी भुवनेश्वर येथील
भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (जल
व्यवस्थापन) चे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती तसेच परभणी येथील अखिल भारतीय
समन्वित संशोधन प्रकल्प (सिंचन जल व्यवस्थापन) चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी
यांनी सर्व संबंधितांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.
.jpeg)