वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि
महाविद्यालय, परभणी येथील विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट
सेलच्या वतीने दिनांक ४ मे २०२६ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या
मुलाखतीत रॉयल फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स, पुणे या
नामांकित कंपनीमध्ये कृषि महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची विक्री अधिकारी (Sales
Officer) पदासाठी अंतिम निवड करण्यात आली. त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र
देण्यात आले आहे.
ही संपूर्ण
निवड प्रक्रिया विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार
यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या नेतृत्वात
यशस्वीरित्या पार पडली.
मुलाखत
प्रक्रियेस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अविनाश सावगावे, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक श्री. शेख सुरज,
विक्री अधिकारी श्री. रामभाऊ पवार तसेच श्री. सय्यद जुबैर उपस्थित
होते. या निवड प्रक्रियेत कृषि महाविद्यालय, परभणी येथील ३५
विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. गुणवत्ता, संवादकौशल्य
आणि तांत्रिक ज्ञानाच्या आधारे अंतिम निवड करण्यात आली.
निवड झालेल्या
विद्यार्थ्यांमध्ये कनिष्क गायकवाड,
चंद्रशेखर खुनेवाड, केदार परातकर, कृष्णकांत पोतदार, मोहन फुलवारे, रोहित चव्हाण आणि संकेत दळवी यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांची विक्री
अधिकारी पदासाठी निवड करण्यात आली आहे.
याबाबत माहिती
देताना प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ. रणजित चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या गुणवत्ता,
कौशल्य आणि कार्यक्षमतेच्या आधारे करण्यात आली आहे. या यशस्वी निवड
प्रक्रियेत प्लेसमेंट सेलच्या सदस्य सचिव डॉ. अनुराधा लाड तसेच संपूर्ण टीमचे
विशेष योगदान लाभले.
निवड झालेल्या
विद्यार्थ्यांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य तसेच प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ.
रणजित चव्हाण यांनी अभिनंदन केले. या यशामुळे महाविद्यालयातील इतर
विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कृषी क्षेत्रातील
रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास चालना मिळाली आहे.
