वनामकृविच्या उद्यानविद्या महाविद्यालयाद्वारा मौजे सूरपिंपरी येथे ‘खेती बचाओ अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता
कार्यानुभव (रावे)
कार्यक्रमांतर्गत ‘खेती बचाओ अभियान’ मौजे सूरपिंपरी (ता. जि.
परभणी) येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.
यावेळी मार्गदर्शन
करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘खेती बचाओ अभियान’ हे केवळ
जनजागृती अभियान नसून देशाच्या अन्नसुरक्षा व शाश्वत कृषी विकासाशी निगडित
राष्ट्रीय चळवळ असल्याचे सांगितले. त्यांनी जमिनीची सुपीकता जपणे, पाण्याचा
कार्यक्षम वापर करणे, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन
करणे तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे ही
काळाची गरज असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांनी वैज्ञानिक तंत्रज्ञान, आधुनिक कृषी संशोधन आणि विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब केल्यास उत्पादन
खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
‘खेती
बचाओ अभियान’ अंतर्गत मृदा संवर्धन, जलसंधारण, सेंद्रिय पदार्थांचा वापर, पीक विविधीकरण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार
करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन
नसून देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ‘मृदा वाचवा,
पाणी वाचवा आणि शेती वाचवा’ हा संदेश आत्मसात करून पुढील
पिढ्यांसाठी शेती समृद्ध ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठाचे शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकऱ्यांना कमी पाण्यावर शेती नियोजन कसे करावे याबाबत
मार्गदर्शन केले. त्यांनी कोरडवाहू शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून
उत्पादनक्षमता वाढविण्याचे उपायही सांगितले.
सूरपिंपरीचे सरपंच
श्री. विलास बाबर यांनी गावातील विविध पिके, त्यावरील रोग व कीड समस्या
तसेच त्या समस्यांवर विद्यापीठामार्फत मिळणाऱ्या तांत्रिक सहाय्याबाबत समाधान
व्यक्त केले. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन
केले.
प्रास्ताविक
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी केले. त्यांनी ग्रामीण
भागातील शेतीसमोरील आव्हाने, विद्यार्थ्यांची भूमिका आणि
विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांचे महत्त्व याविषयी
सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE)
अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर विविध प्रात्यक्षिकांद्वारे
उत्पन्नवाढीचा संदेश दिला.
मृदाशास्त्र
विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी माती परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
त्यांनी मातीचा नमुना घेण्याची योग्य पद्धत, प्रयोगशाळेतील तपासणी
प्रक्रिया तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन राखण्याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन
केले.
कार्यक्रमाच्या
यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालंबडी, विषय
विशेषज्ञ डॉ. आनंद दौंडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पव्हणे,
डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. आशा सातपुते तसेच
मौजे सूरपिंपरी येथील जगन्नाथ पवार, सर्जेराव पवार, श्रीराम जाधव, कपिलराव धुमाळ व इतर ग्रामस्थ,
ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती होनराव, सहाय्यक
कृषी अधिकारी श्रीमती शिंदे आणि सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग
नोंदविला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी ऋतुजा खंदारे व वैष्णवी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरत साठे यांनी मानले.




.jpeg)
.jpeg)