या भेटीदरम्यान
माननीय कुलगुरूंनी विद्यार्थिनींशी मुक्त संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगती, वसतिगृहातील
सुविधा, स्वच्छता, सुरक्षा, भोजन व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींविषयी माहिती घेतली.
विद्यार्थिनींनीही विविध समस्या व सूचना मान्यवरांसमोर मांडल्या. त्यावर सकारात्मक
चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.
माननीय कुलगुरूंनी
विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त,
आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण
प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या उपलब्ध
सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित
मान्यवरांनीही विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या
संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय उत्तरा मुलींच्या
वसतिगृहाच्या सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले.

.jpeg)
.jpeg)

