वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रामध्ये नव्याने खरेदी करण्यात आलेल्या
अत्याधुनिक ट्रकचे लोकार्पण दि. ४ जून २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते विधिवत पूजन
करून ट्रकचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर,
नियंत्रक श्री. अनंत कदम, संशोधन उपसंचालक तथा
विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. हरिहर कौसडीकर,
प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
नवीन ट्रकच्या समावेशामुळे बीज वाहतूक, साठवण आणि वितरण प्रक्रिया अधिक गतिमान होणार असून शेतकऱ्यांना दर्जेदार
बियाण्यांचा वेळेत पुरवठा करण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या बीज उत्पादन
उपक्रमांना अधिक बळकटी मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
विद्यापीठाच्या बीज उत्पादन व प्रक्रिया कार्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे
कौतुक करताना शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचविण्यासाठी आधुनिक
सुविधांचा वापर वाढविण्यावर भर दिला. नवीन वाहनामुळे बीज प्रक्रिया केंद्राच्या
कार्यक्षमतेत वाढ होऊन विद्यापीठाच्या कृषि विकासातील योगदानाला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी नव्या ट्रकची
पाहणी करून विद्यापीठाच्या बीज उत्पादन व वितरण व्यवस्थेला मिळालेल्या या नव्या
सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बीज प्रक्रिया केंद्राचे अधिकारी, कर्मचारी तसेच बीज उत्पादन व प्रक्रिया विभागाशी संबंधित मान्यवर मोठ्या
संख्येने उपस्थित होते.

.jpeg)
