विकसित भारत २०४७ च्या पूर्ततेसाठी कौशल्य विकासावर भर द्या – डॉ. बाबासाहेब ठोंबरे
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती
रोगशास्त्र विभागात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने दोन आठवड्यांच्या ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम
(OJT) अंतर्गत अळिंबी
उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या
अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमास कृषि महाविद्यालय, परभणीचे
अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,
नांदेड अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालय, संत
तुकाराम महाविद्यालय आणि ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी
येथील एकूण ५० विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षणाच्या
उद्घाटनप्रसंगी डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून
मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करून कौशल्य विकास साधण्याचे आवाहन केले. विकसित भारत
२०४७ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवकांनी कौशल्याधारित ज्ञान आत्मसात करणे
आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच,
रोजगाराच्या शोधात वेळ घालविण्याऐवजी स्वतः रोजगारनिर्मिती करणारे
उद्योजक बना, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रमुख पाहुणे
डॉ. प्रवीण वैद्य यांनी विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन
स्वतःचे तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा प्रशिक्षणांची भूमिका
महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
अळिंबी
उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन डॉ.
प्रफुल्ल घंटे, प्रशिक्षण समन्वयक
तथा वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख, कृषि महाविद्यालय,
परभणी यांनी केले आहे. या प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी विभागातील
डॉ. संदीप बडगुजर, डॉ. विक्रम घोळवे, डॉ.
चंद्रशेखर अंबाडकर आणि डॉ. मीनाक्षी पाटील यांनी सहकार्य केले. तसेच डॉ. पद्मावती
खंडारे, श्री. कपिल निवर्ळ आणि श्री. राम मुंढे यांनी मोलाचे
योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी उपस्थितांचे आभार
मानले.
