वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यापीठाच्या
छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक (संशोधन)
डॉ. सूर्यकांत पवार यांनी दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी
अल्पकालीन उपाययोजना सुचविल्या आहेत. पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या
परिस्थितीत फळबागांवरील ताण कमी करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी
पुढील उपाययोजनांचा अवलंब करावा.
आच्छादनाचा वापर
जमिनीतील पाणी बाष्पीभवनाव्दारे तर झाडातील पाणी पानामधून होणा-या उत्सर्जन क्रीयेमुळे झपाटयाने कमी होते. या
दोन्ही क्रीयांना प्रतिबंध करण्यासाठी आच्छादनाचा वापर करणे फायदेशीर ठरते. जमिनीतील
ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. आच्छादनासाठी
पॉलिथिन फिल्म़चा किंवा सेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो. उपलब्धदतेप्रमाणे
शेतक-याने ८०-१०० मायक्रॉन
जाडीची फिल्म़ आच्छादनासाठी वापरल्यास अतिशय फायघाचे ठरते. सेंद्रीय
स्वरुपाचे आच्छादने वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
सेद्रिंय आच्छादने-वाळलेले गवत,लाकडी भुसा,ऊसाचे पाचट,पालापाचोळा,गव्हाचे काड,भाताची काड,गिरीपुष्प फळझाडाच्या ड्रिपखाली ४ ते
६ इंच
जाडीचा आच्छादनाचा थर घावा. त्या
ठिकाणी तंतूमय मुळया पसरलेले असतात. सेद्रिंय
आच्छादन करण्यापुर्वी वाळवीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून त्यावर/त्याखाली फॉलीडॉल अथवा लिंडेन पावडरची भुकटी धुरळावी.
मडका सिंचन
फळझाडासाठी मडका सिंचनाचा वापर करता येतो. कमी
खर्चीक आणि पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर होणा-या या पध्दतीत कमी वयाच्या लहान फळझाडासाठी ५-६ लिटर
क्षमतेचे तर मोठया झाडाच्या झाडासाठी १५ लिटर
क्षमतेचे मडके निवडावे. त्याच्या
तळाशी लहानशे छिद्र पाडून त्यात कापडाची चिंधी बसवून मडक्याचे तोंड जमीनीच्या वर राहील अश्या़ बेताने मडके झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत पुरावे व ते पाण्याने भरुन मडक्याच्या तोंडावर झाकण ठेवावे. मडक्याच्या
सछिद्र रचनेमुळे ते पाझरते व त्यातील पाने हळूहळू पसरुन जमिनीत ओलावा तयार होतो. त्यामुळे
झाडांच्या मुळाना सातत्याने आवश्यकतेएवढा पाण्याचा पुरवठा संथ गतीने होऊ शकतो. मडके
रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे.
काळजी
- आंतर मशागत करतांना मडके फुटणार नाही याची काळजी घावी.
- शेतामध्ये जनावरे मडके तुडवणार नाही याची दक्षता घ्यावी.
- मडके सछिद्ऱ असावे.
सलाईन बाटल्यांचा वापर
ठिबक सिंचनासारखे थोडेथोडे पाणी कार्यक्षमतेने वापरण्यासाठी आणि अगदी थेट झाडाच्या मुळयाजवळ देण्यासाठी सलाईनच्या बाटल्या वापरता येतील. पाणी
पडण्याचा वेग सलाईनप्रमाणे कमी-जास्त़ करता येईल. सलाईनच्या
प्लास्टिक बाटल्यामध्ये पाणी भरुन फांदीच्या आधाराने बाटली झाडाजवळ टांगावी. तीची
नळी झाडाच्या मुळाजवळ जमिनीच्या वरच्या थरात ठेवावी.
काळजी
- पाणी वेळोवेळी मुळांजवळ पडते किवा नाही याची तपासणी करावी.
- कचरायुक्त/गढूळ पाणी सलाईन बाटलीमध्ये वापरु नये.
खोडास बोर्डोपेस्ट़ लावणे
उन्हाळयाच्या दिवसात देखील पाण्याचे दुर्भीक्ष असलेल्या काळात मोंसंबी खेाडास बोर्डोपेस्ट़ लावणे अत्यंत फायघाचे ठरु शकते. यासाठी
फळझांडाच्या खोडास (१ किलो
मोरचूद, १ किलो
कळीचा चुना, १० लिटर
पाणी) बोर्डोपेस्ट़चा लेप घावा. त्यामुळे
खोडाचे उष्णतेपासून सरंक्षण होईल.
व्यवस्थापन
- खोडास बोर्डोपेस्ट़ लावतांना स्वच्छ़ ब्रशचा वापर करावा.
- बोर्डोपेस्टची शक्ती मिश्रणाच्या तीव्रतेवर व सामूवर अवलंबून असल्यामूळे योग्य त्या प्रमाणातच वापर करावा.
- तयार मिश्रणात निळा लिटमस पेपर अथवा लोखंडी खिळा वा चाकू बुडविला असता त्यावर तांबट थर दिसणार नाही याची काळजी घ्यावी.
- तांबट थर दिसल्यास मिश्रणात मोरचूदाचे प्रमाणा जादा असते अशावेळी त्या मिश्रण चुन्याचे द्रावण ओतावे.
- बोर्डोपेस्ट़ प्लास्टीकच्या/मातीच्या भांडयातच स्वंतत्रपणे तयार करावी. (लोखंडी बादली वापरु नये)
झाडाचा पानोळा/फळ संख्या कमी करणे
झाडावरील पानामधून देखील पाण्याचे उत्सर्जन होत असते. पानावरील पर्णरध्रे पाणी बाहेर टाकत असतात. त्यामुळे
झाडांची हलकीशी छाटणी करुन पानांची/फळांची संख्या कमी केल्यास पानामधून निघून जाणारे पाण्याचे प्रमाण कमी करता येवू शकते. मोसंबीवरील
पानसोट काढून टाकणे. कमी
ओलीत असणा-या शेतक-यांनी पाण्याचे नियोजन करुन फळसंख्या मर्यादीत ठेवावी. मोसंबी
झांडावरील पानसोट(वाटरशुट) मोठया प्रमाणावर वाढविले असता त्याची वेळेवर छाटणी करुन काढल्यास झाड सशक्त़ राहून पाण्याची बचत होईल.
काळजी
- हलकी छाटणी करण्यासाठी अथवा पानोळा कमी करण्यासाठी तीक्ष्ण वा धारदार सिकेटरचा/कात्रीचा वापर करावा.
- छाटणी करतांना फांदी पिचणार नाही याची काळजी घ्यावी.
- मर्यादेपेक्षा जास्त़ पानोळा छाया, करु नये अन्यथा झाडावर विपरीत परिणाम अन्यथा झाडावर विपरीत परिणाम होईल. या छाटणी केलेले ठिकाणी बोर्डोपेस्ट़ लावावा.
बाष्परोधकाचा वापर
पानाच्या पर्णरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रण करणेसाठी व प्रकाश संश्लेषणाचा वेग योग्य़ तो राखण्यासाठी ६ ते ८ टक्के
केवोलीन बाष्परोधकाची (६०० ते
८०० ग्रॅम
१० लिटर
पाण्यात) फवारणी १५ दिवसाच्या
अंतराने १ ते
२ वेळा
करावी.
काळजी
दोन वा तीन फवारण्यापेक्षा जादा फवारणी करु नये.
खोडास गवत/बारदाना बांधणे
पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे तसेच सुर्याचा प्रखर सुर्यप्रकाश खेाडावर पडत असल्यामुळे खोडास इजा पोहचू शकते. तसेच
खोड तडकण्याची शक्यता देखील नाकरता येत नाही. त्यासाठी
गवत अथवा बारदाना सुतळीच्या साहाय्याने खेाडाच्या संपुर्ण भागावर घटटपणे बांधावा. यामुळे
झाडाच्या खोडाचे प्रखर सुर्य प्रकाशापासून सरंक्षण होवू शकते व खोडास/सालीस इजा पोहचू शकत नाही.
काळजी
- फळबागामध्ये बिडी/सिगारेट पिऊ नये.
- शेतात गवताच्या गंजीस/पाचटास आग लावू नये.
- गवत बांधण्यापुर्वी खोडावर लिडेंन अथवा कार्बारिल भुकटी टाका.
- गवत/बारदान घटट बांधावा जेणेकरुन वा-यामुळे उडून जाणार नाही.
कलमी/रोपावर शेडनेटची सावली करणे
रोपावर शेडनेटची सावली करुन झाडे रोपे ठेवली असता ऊसर्जनाचा दर कमी होवून कमी पाण्यावर जगविता येतात.
काळजी
- शेडनेट फाटलेली नसावी.
- शेडनेटमध्ये फॉर्मस असल्यास अधुनमधून त्याचा वापर करुन तापमान नियंत्रीत ठेवता येते.
दिर्घ मुदतीकरीता करावयाच्या उपाययोजना
ठिबक सिंचनाचा वापर
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ओलीताच्या
गंभीर टंचाईमूळे ठिबक सिंचन पध्दतीकडे लोकांचा कल वाढत आहे. ठिबक
सिंचनामुळे मोसंबी फळांचे अधिक व दर्जेदार उत्पन्न मिळविता येते. आवश्यक
तेवढी पाण्याची मात्रा झाडाच्या थेट सुक्ष्म़ मुळाशीच पुरविली जाते. तसेच
पाण्यात विरघळणारी खते व सुक्ष्म़ अन्नद्रव्ये सुध्दा याव्दारे देता येतात. पाण्याचा
थेंब न थेंब वाया न जावू देता कमी पाण्यात जास्त़ ओलीत करण्यासाठी ठिबक सिंचन ही काळाची गरज आहे.
काळजी
- वेळोवेळी ड्रीपरची तपासणी करावी.
- दररोज ठिबक चालविण्याची गरज नाही.
- वाफसा स्थिती आल्यावरच ठिबकसंच सुरु करावा.
- क्षारयुक्त पाण्याचा वापर ठिबकसंच साठी करु नये.
अधिक माहितीसाठी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ
सूर्यकांत पवार यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२१७८९८२
यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा
.jpeg)