CIMMYT चे भारतातील प्रमुख डॉ. महेश गथाला व IMMDA चे अध्यक्ष ॲड. सूर्यकांत सांडसे पाटील यांची वनामकृविच्या एनएआरपी – एटीएस परिसराला भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प (NARP)
येथील कृषी तंत्रज्ञान केंद्र (ATS) परिसरात मका
पिकासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली प्रस्तावित
‘उत्कृष्टता केंद्र’ (Centre of Excellence – CoE) स्थापन करण्याच्या
दृष्टीने आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा केंद्र (CIMMYT - (International
Maize and Wheat Improvement Center) यांचे भारतातील प्रमुख डॉ.
महेश गथाला, CIMMYT व BISA (Borlaug Institute for South Asia) चे वरिष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. परेश शिरसाठ तसेच इंडो-मका अँड मिलेट्स डेव्हलपमेंट असोसिएशन (IMMDA)
चे अध्यक्ष ॲड. सूर्यकांत सांडसे पाटील यांनी शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी भेट देऊन प्रस्तावित जागेची आणि उपलब्ध सुविधांची
पाहणी केली.
या भेटीदरम्यान प्रस्तावित केंद्रासाठी उपलब्ध
असलेली जागा, पायाभूत सुविधा, संशोधन व प्रात्यक्षिकांसाठी
आवश्यक तांत्रिक बाबी, CIMMYT सोबत सहकार्याच्या संधी आणि केंद्राच्या
स्थापनेच्या पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रस्तावित उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून
मका पिकातील संशोधनाला चालना देणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा
प्रसार करणे, गुणवत्तापूर्ण बियाणे प्रणाली बळकट करणे,
शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणे, प्रात्यक्षिके
आयोजित करणे आणि मका पिकाच्या मूल्यसाखळीचा विकास साधणे हे उद्दिष्ट आहे. तसेच संशोधन
संस्था, शासकीय यंत्रणा, कृषी उद्योग आणि
शेतकरी यांच्यात समन्वय व सहकार्य वाढविण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार
आहे.
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद
भेटीदरम्यान मान्यवरांनी लाहाखेडी येथील शासकीय
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना संशोधन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन
केले. डॉ. परेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,
अभ्यासाचे नियोजन कसे करावे, विषयांचा सखोल अभ्यास
आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांमध्ये
यश मिळविण्यासाठी योग्य दिशा, शिस्त आणि नियमित अभ्यास आवश्यक
असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी प्रगतिशील शेतकरी श्री. मंगटे यांनी शेतकरी
उत्पादक कंपनी (FPO) स्थापन करण्याची प्रक्रिया, तिचे फायदे, शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागाचे महत्त्व
तसेच स्वतःच्या शेतीतील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. शेतमालाचे एकत्रित संकलन,
विपणन आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी
FPO महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे
त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान कृषी तंत्रज्ञान विद्यालयाचे प्राचार्य
श्री. दत्तात्रय मुळे उपस्थित होते. तसेच CIMMYT, BISA, IMMDA आणि विद्यापीठाच्या संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
प्रस्तावित उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेच्या
दृष्टीने झालेली ही पाहणी मका संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण,
शेतकरी प्रशिक्षण आणि कृषी क्षेत्रातील संस्थात्मक सहकार्य अधिक बळकट
करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




.jpeg)

.jpeg)
.jpeg)