वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक
विज्ञान महाविद्यालयातील रावे-२०२६ (RAWE – Rural Agricultural Work
Experience ग्रामीण जागरूकता कार्यानुभव) कार्यक्रमांतर्गत
विद्यार्थ्यांनी सनपुरी (ता. जिल्हा परभणी) येथे आयोजित ग्रामीण जागरूकता
कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.
नीता गायकवाड आणि समन्वयक डॉ शंकर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी
या कार्यक्रमात सहभाग नोंदवून ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांच्या
समस्या, कृषीविषयक वास्तव आणि ग्रामीण समुदायाच्या गरजा
यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जनजीवन समजून घेण्याची, शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधण्याची तसेच
अभ्यासक्रमात आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष परिस्थितीत उपयोग करण्याची संधी
मिळाली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी दाखविलेली मेहनत, उत्साह, शिस्त आणि समर्पण कौतुकास्पद ठरले.
ग्रामीण
जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक
जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा असून,
यामुळे त्यांचे व्यावहारिक ज्ञान समृद्ध होण्यास, आत्मविश्वास वाढण्यास आणि ग्रामीण समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ
होण्यास मदत होते.
कार्यक्रम
यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व रावे-२०२६ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात
आले. तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचाल आणि नवीन जबाबदाऱ्या पार पाडताना
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग समाजहितासाठी करावा, शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपावी आणि
प्रामाणिकपणा व समर्पणाच्या भावनेतून कार्य करावे, अशा
शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना विषय विशेषज्ञ कल्पना लहाडे, ज्योती
मुंडे आणि आदिनाथ बेले यांचेही मार्गदर्शन लाभले. या यशस्वी कार्यानुभव
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण वास्तवाची जाणीव होऊन भविष्यातील
व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त अनुभव प्राप्त झाला आहे.
