वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी
व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन (मुली) क्रीडा स्पर्धा-२०२६ मध्ये अन्नतंत्र महाविद्यालय, परभणीच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा
तुरा रोवला.
ही स्पर्धा दिनांक
१४ ऑक्टोबर २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण
अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अन्नतंत्र महाविद्यालयाच्या
केतकी जाधव, वैष्णवी पांचाळ,
आयुषी कुमारी आणि जान्हवी वुईके यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत
प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेच्या उद्घाटन
समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, तर उद्घाटक म्हणून शिक्षण
संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे उपस्थित होते. यावेळी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विद्यार्थी
कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर,
तसेच बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री. रविंद्र पतंगे देशमुख यांची प्रमुख
उपस्थिती होती.
या उल्लेखनीय यशाबद्दल
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते विजेत्या संघाचे अभिनंदन करण्यात
आले. तसेच, अन्नतंत्र महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर यांच्या हस्तेही विजेत्या खेळाडूंचा विशेष सत्कार
करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थिनींना डॉ. के. एस. गाढे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी
त्यांचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
