मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन; ५०० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या
वतीने नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे दिनांक १८ ऑक्टोबर २०२६
रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मराठवाड्यात सध्या उद्भवलेल्या दुष्काळी
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ५०० हून
अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद
साधत सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा काटकसरीने वापर, जलसंधारण, जमिनीतील ओलावा टिकवून
ठेवणे आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब
करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा व
संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमास विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा विधानसभा सदस्य माननीय
आमदार श्री. बालाजी कल्याणकर, श्री. भास्करराव कदम, श्री. संजय कदम, श्री. विठ्ठल पावडे, श्री. दत्तात्रय कदम, श्री. गोपाळराव कदम, श्री. दीपकराव कदम, श्री. राजेंद्र कदम, श्री. ज्ञानोबा किरगे, श्री. नरहरी किरगे, श्री. लिंबाजी लिंडगे आदी
मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रगतशील शेतकरी श्री. प्रकाश कदम, श्री. अशोक कदम, डॉ. संजय कदम, नांदेड येथील कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. रणजित चव्हाण, डॉ. रमेश
पाटील, श्री. पवन ढोके, तालुका कृषि
अधिकारी श्री. गोविंद कोल्हे आणि जिल्हा रेशीम अधिकारी श्री. गोविंद कदम यांची
उपस्थिती होती.
शेतकरी, लोकप्रतिनिधी, कृषि अधिकारी आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्यात थेट संवाद घडवून आणणारा हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांना परिस्थितीनुरूप कृषि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
