मराठी भाषेचा समृद्ध वारसा जतन करून तिच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस व सप्ताहानिमित्त
दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुनाथ जायभाये होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अरविंद सगर उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुनाथ जायभाये यांनी मराठी भाषेचे
शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा आदर राखून
मराठी भाषेचा वापर वाढवावा आणि आपल्या समृद्ध भाषिक परंपरेचे जतन व संवर्धन करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते प्रा. अरविंद सगर यांनी ‘मराठी
भाषा : सांस्कृतिक वारसा, अभिमान आणि उज्ज्वल भविष्य’ या विषयावर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, साहित्यिक परंपरा आणि सामाजिक जीवनातील तिचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी
भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने
योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण, संशोधन आणि दैनंदिन
व्यवहारात मराठी भाषेचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन त्यांनी
केले.
प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी अभिजात मराठी
भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, भाषेचे जतन व
संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमानाची भावना निर्माण करण्याचे
महत्त्व विशद केले.
यावेळी डॉ. मधुकर मोरे यांनीही मराठी भाषेची परंपरा, तिचे संवर्धन आणि नव्या पिढीमध्ये भाषेविषयी जागरूकता निर्माण
करण्याची गरज याविषयी आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचे नियमित
वाचन करावे आणि भाषेच्या विकासासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे
आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास डॉ. संदीप पायाळ, प्रा.
दत्तात्रय पाटील, डॉ. अनिकेत वाईकर, इंजि.
एस. के. शिवणकर, इंजि. दीपक राऊत तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुकर मोरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. गजानन वसू यांनी केले. त्यांनी कार्यक्रमासाठी
उपस्थित मान्यवर, प्रमुख वक्ते, प्राध्यापक,
कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. रमेश मोहिते, श्री. प्रमोद राठोड, श्री. शंकर शामार्थी,
श्री. जितेंद्र खिल्लारे तसेच विद्यार्थी यश जाधव, संकेत पवार, गणेश बोराडे, यश ढाकणे,
कीर्ती शिंदे, श्रद्धा पवार, सौरभ निहाल आणि राम शेंडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
.jpeg)



.jpeg)
