Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Sunday, January 18, 2015
Wednesday, January 14, 2015
कोरडवाहु शेतीचे तंत्रज्ञान शेतक-याच्या परिस्थितीस अनुकूल असावे....कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
एक दिवसीय कार्यशाळेत शेतकरी व कृषि शास्त्रज्ञ
यांच्यात थेट संवाद
संशोधनाच्या आधारे कृषि विद्यापीठ शेतक-यांसाठी
विविध तंत्रज्ञानाची शिफारस करते, परंतु हे तंत्रज्ञान अवलंब करतांना शेतक-यांना अनेक
अडचणींना तोंड दयावे लागते, त्यासाठी कृषि शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्या प्रत्यक्ष
चर्चा होणे गरजेचे आहे, म्हणजे कृषि शास्त्रज्ञांना शेतक-यांना अनुकूल तंत्रज्ञान
देता येईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ
बी व्यंकटेश्वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प व हैद्राबाद
येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्था (क्रीडा) यांच्या संयुक्त विद्यमाने कोरडवाहु
शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी एक दिवसीय सल्ला कार्यशाळेचे
दि. १३ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, या कार्यशाळेच्या उद्घाटना प्रसंगी
ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, हैद्राबाद
येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्थेचे (क्रीडा) प्रकल्प समन्वयक डॉ
रविंद्र चारी, कुलसचिव डॉ डि एल जाधव, आत्माचे उपप्रकल्प संचालक श्री अशोक काळे,
मुख्य शास्त्रज्ञ डॉ सुरेंद्र चौलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
पुढे म्हणाले, की मराठवाडयातील शेती ही कोरडवाहु असल्यामुळे कोरडवाहु शेतीचा विकास
म्हणजेच मराठवाडयातील शेतक-यांचा विकास होय. याभागात कापुस व सोयाबीन ही मुख्य पिके
असुन यावर्षीच्या खरिप हंगामात कृषि विभाग व विद्यापीठाने सोयाबीन लागवडीसाठी रूंद
वरंबा व सरी (बीबीएफ) पध्दतीचा
मोठा प्रसार केला, यासाठी कृषि विभागाच्या वतीने बीबीएफ लागवड यंत्राचे वाटप करण्यात
आले होते. ज्या शेतक-यांनी सोयाबीनची लागवड बीबीएफ पध्दतीने केली, त्यांना कमी पर्जन्यमानातही
निश्चितच ब-यापैकी उत्पादन मिळाले.
डॉ रविंद्र चारी यांनी
कोरडवाहु संशोधनाबाबत माहिती देतांना सांगितले, की कोरडवाहु शेतीसाठी विद्यापीठाने
व क्रीडा संस्थेने अनेक तंत्रज्ञान शिफारसी दिल्या आहेत, परंतु या शिफारसी शेतक-यापर्यंत
परिपुर्ण पोहचल्या आहेत का?
त्यांचा अवलंब करतांना शेतक-यांना काय समस्या येतात? त्याच्या
प्रसार व विस्तारासाठी कीती वाव आहे? हयासाठी
याप्रका-याच्या कार्यशाळा आयोजीत करणे गरजेचे आहे. संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर
म्हणाले, की कोरडवाहु शेतीत अनेक आव्हाने आहेत, कमी पर्जन्यमानात तग धरू शकतील असे
तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वेळोवेळी शास्त्रज्ञ, कृषि विस्तारक व शेतकरी यांचात
संवाद होणे गरजेचे असुन अशा कार्यशाळेचे आयोजनावर विद्यापीठ भर देत आहे. कृषि विभागाने
संपुर्ण राज्यात कोरडवाहु शेतक-यांसाठी साधारणत: सात हजार बीबीएफ लागवड यंत्राचे वाटप
केल्याची माहिती आत्माचे उपप्रकल्प संचालक श्री अशोक काळे यांनी दिली.
कार्यशाळेत कोरडवाहु संशोधन
केंद्राने विकसित केलेले तंत्रज्ञान जसे की, बीबीएफ लागवड पध्दत, जलसंधारण सरी, आंतरपिक
पध्दती, विहीर पुर्नभरण, शेततळे व संरक्षित सिंचन आदींवर डॉ सुरेंद्र चौलवार, डॉ मदन
पेंडके व वरिष्ट शास्त्रज्ञ डॉ आनंद गोरे यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर चर्चा
करण्यात आली. याप्रसंगी या तंत्रज्ञानाबाबत शेतक-यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना
व समस्यांना कृषि शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली. याचर्चेत अकोला येथील डॉ महेंद्र
नागदिवे, सोलापुर येथील डॉ विजय अमृतसागर, डॉ एम जी उमाटे, डॉ डि ए चव्हाण व प्रगतशील
शेतकरी श्री सोपनराव अवचार, श्री उदयराव खेडेकर, श्री गिरीष पारधे यांच्यासह विविध
भागातील शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत
शेतक-यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वि़द्यापीठ शास्त्रज्ञ कोरडवाहु शेतीसाठी
उपयुक्त तंत्रज्ञानात संशोधनाच्या आधारे सुधारणा करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
डॉ पी एच गौरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य शास्त्रज्ञ डॉ सुरेंद्र चौलवार यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी डॉ
जी के गायकवाड, श्रीमती सारिका नारळे, श्री माणिक समिद्रे, शेख सय्यद, सुनिल चोपडे
आदींनी परिश्रम घेतले.
Tuesday, January 13, 2015
रासायनिक तणनाशकांचा वापर काळजीपुर्वक व्हावा..... कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
शेतक-यांचा पिकातील तण व्यवस्थापनासाठी
मोठा खर्च होते त्यावर पर्याय म्हणुन रासायनिक तणनाशकांचा वापर आज देशात व राज्यात
वाढत आहे, परंतु त्याचा अमर्यादित वापर होऊ नये. ब-याच वेळा शेतकरी तणनाशकांचा
वापर खत व बियाणे विक्रीत्यांचा सल्लाने करतात, परंतु खत व बियाणे विक्रीत्यांना
त्याचे पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे त्यांना देखिल याबाबत प्रशिक्षीत
करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी केले.
केंद्रीय कृषि
मंत्रालयाच्या सौजन्याने व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी वि़द्यापीठाच्या संशोधन
संचालनालय व कृषिविद्या विभाग यांच्या विद्यमाने ‘पीक
उत्पादन वाढीसाठी तणनाशकाचा योग्य वापर’ या विषयावर राज्याच्या कृषी विभागातील कृषी
पदवीधारक कर्मचारी, कृषि विद्यापीठातील, कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्तारकांसाठी दि ६ ते १३ जानेवारी दरम्यान
आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रशिक्षणाच्या
समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास कुलसचिव डॉ डी एल जाधव, कृषि
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले व प्रा डॉ बी व्ही आसेवार यांची प्रमुख
उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले, की प्रत्यक्ष शेतक-यांच्या संपर्कात असणारे कृषि विस्तारकांचे
अनुभव हे विद्यापीठाच्या संशोधनासाठी उपयुक्त असुन यासाठी याप्रकारच्या प्रशिक्षणाची
आवश्यकता आहे. कुलसचिव डॉ डी एल जाधव आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, की आज बाजारात
अनेक नवनवीन तणनाशके उपलब्ध होत असुन त्याच्या वापराबाबत शेतक-यांना अनेक अडचणी
येतात, त्या सोडविण्याचे महत्वाचे कार्य कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना
करावे लागते, त्यांनाच शेतक-यांचा सल्लागार
म्हणुन भुमिका बजवावी लागते. यासाठी अशाप्रकाराच्या प्रशिक्षणातील ज्ञान उपयुक्त
आहे.
कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थी कृषि अधिकारी सय्यद रहिम यांनी
प्रशिक्षणात प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष शेतक-यांना मार्गदर्शन
करतांना निश्चित होईल असे मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ
ए एस कार्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण समन्वयक डॉ अशोक जाधव यांनी
केले. याप्रसंगी मान्यवरांच्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात
आले. कार्यक्रमास सहभागी प्रशिक्षणार्थी, विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी व
कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Monday, January 12, 2015
Saturday, January 10, 2015
जनुकीयदृष्टया परिवर्तीत पीके शेतक-यांच्या फायदयाचीच.......कुलगुरू मा.डॉ.बी.व्यंकटेश्वरलु
वनामकृवीत जनुकीयदृष्टया
सुधारित पीकांसंबधी एक दिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन
| मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु |
विविध देशात जनुकीय
परिवर्तीत पीके ही किड व रोग प्रतिकारक, तणनाशकाशी मुकाबला करणारी, शेतमाल
टिकावुपणा व पोषणमुल्य वृध्दी अशा विविध गुणधर्मांनी संपन्न अशी विकसित करण्यात
आली असुन यामुळे उत्पादनवाढ, पर्यावरणाचा समतोल व मशागतीच्या खर्चात कपात होऊन
शेतक-यांना फायदयाचीच आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी
केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व बायोटेक कंसोर्टियम इंडिया
लिमिटेड, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने दि ९ जानेवारी रोजी जनुकीयदृष्टया
सुधारित पीकांसंबधीच्या विविध पैलुंवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
हे होते तर जनुक अभियांत्रिकी मान्यता समितीचे सदस्य डॉ ओ पी गोवीला, नवी दिल्ली
येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्या मुख्य सरव्यवस्थापिका डॉ विभा
आहुजा, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व विस्तार
शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले, की राज्यातील
शेतक-यांनी बी टी कापसाला मोठा प्रतिसाद दिला असुन स्वत: शेतकरी डोळसपणे
तंत्रज्ञान अवलंब करित असुन आपआपल्या स्तरावर तंत्रज्ञानात बदल करीत आहेत. मराठवाडयातील
जालना व औरंगाबाद जिल्हयात मोठया प्रमाण विविध पीकांचे बियाणे निर्मिती होऊन
देशातील अनेक राज्यात त्याची विक्री होते. मराठवाडयातील कापुस व सोयाबीन ही मुख्य
जिरायती पीके असुन अनिश्चित हवामानामुळे पीकांची उत्पादकता कमी झाली आहे. वनामकृविनेही
महाबीजशी साम्यजंस्य करार केला असुन कपाशीच्या एनएचएच-४४ (नांदेड-४४) वाण हे लवकरच जनुकीयदृष्टया
परिवर्तीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनुक अभियांत्रिकी मान्यता समितीचे सदस्य डॉ ओ पी गोवीला आपल्या भाषणात
म्हणाले, तंत्रज्ञानाच्या जोरावर देशात हरितक्रांती होऊन अन्नधान्याच्या
बाबतीत स्वयंपुर्ण झाला, परंतु गेली काही वर्षात अन्नधान्याचे उत्पादनात अपेक्षीत
वाढ दिसुन येत नाही. यासाठी जैवतंत्रज्ञानाचा आधार आपणास घ्यावा लागेल. कपाशीत
बोंडअळयाच्या नियंत्रणासाठी अमर्याद रासायनिक किटकनाशकाच्या फवारण्या करून
अळींचे नियंत्रण होत नव्हते, परंतु बी टी वाणामुळे फवारण्या कमी होऊन शकल्या,
कपाशीत रसशोषण करणा-या किडींना प्रतिकारक वाणासाठीचे संशोधन सुरू आहे. तसेच विविध
पीकांत पाण्याचा कार्यक्षम वापर करणारे जनुकियदृष्टया सुधारत वाण येणार असुन
यामुळे कमी पाण्यात चांगले उत्पादन आपणास मिळु शकेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर म्हणाले,
की देशात जनुकीयदृष्टया सुधारित पिकांच्या चाचणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहीला आहे. जनुकीय परिवर्तीत पीकांबाबत शेतक-यांत व
समाजात समज व गैरसमज निर्माण झाले असुन ते दुर करण्यासाठी व समाजात जागृती होण्यासाठी
या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सुत्रसंचालन मेघा उमरीकर यांनी तर आभार
प्रदर्शन डॉ जी के लोंढे यांनी केले.
सदरिल कार्यशाळेत नवी दिल्ली येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्या
मुख्य सरव्यवस्थापीका डॉ विभा आहुजा यांनी भारतातील जनुकीय परिवर्तीत पिकांकरिता
नियामक पध्दतीची माहिती दिली तर डॉ पजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान
केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ संतोष गहुकर यांनी जनुकीय परिवर्तीत पीकांची भुमिका या
विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय पोषण संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ बी दिनेश कुमार
यांनी जनुकीय परिवर्तीत पीके व मानवाच्या अन्नसुरक्षीततावर प्रकाश टाकला तर पुणे
येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मुख्य शास्त्रज्ञा डॉ विद्या गुप्ता यांनी जनुकीय
परिवर्तीत पिकांच्या विकासातील विविध अवस्थेबाबत माहिती दिली. महिको कंपनीचे
संशोधक डॉ नरेंद्र नायर यांनी महीको कंपनीचे जनुकीय परिवर्तीत पिकाच्या वाण
निर्मितीतील भुमिका विषद केली. कार्यशाळेत विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी
व महिला शेतकरी, कृषि विभागातील कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्येने
उपस्थित होते.
| मार्गदर्शन करतांना डॉ ओ पी गोवीला |
| प्रास्ताविक करतांना डॉ दत्तप्रसाद वासकर |
शेतक-यांच्या उन्नतीसाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज...... मा ना श्री बबनराव लोणीकर
राज्यातील
शेतक-यांच्या होणा-या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन, राज्याचा कृषि
विभाग, जिल्हा परिषदेचे
कृषि विभाग, सामाजिक संस्था व
कृषि विद्यापीठ या सर्वांनी सामुदायिकरित्या शेतक-यांच्या उन्नतीसाठी कार्य
करणे गरजेच आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा
व स्वच्छतामंत्री मा ना श्री बबनराव लोणीकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथे दि ९
जानेवारी रोजी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांच्या बैठकीत मार्गदर्शन
करतांना केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु, माजी आमदार अॅड
विजयराव गव्हाणे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण
संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव आदींसह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना
मा ना श्री बबनराव लोणीकर पुढे म्हणाले, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत
असलेले बदनापुर येथील संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तुर पीकाचे विविध वाण आज
संपुर्ण राज्यात व देशात पोहचले आहे. शेतकरी आज ढोबळ पध्दतीने शेती करीत नसुन शेतक-यांनी
आधुनिक शेतीची कास धरली आहे. विद्यापीठाचे
आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधावर गेले पाहीजे. कृषि विद्यापीठाचे महत्व
जनतेला समजले पाहिजे. कृषि विद्यापीठ हे शेतक-यासाठी शक्तीस्थान व आदर्श ठरली
पाहिजे, अशी यापेक्षा
यावेळी त्यांनी व्यक्त केले. शासन दरबारी कृषि विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न
मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मा अॅड
विजयराव गव्हाणे विद्यापीठाचे कृषि संशोधन व शिक्षण बळकट करण्याची अपेक्षा व्यक्त
केली. यावेळी कुलगुरू डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी विद्यापीठाच्या कार्याबाबत
माहिती देतांना सांगितले, की विद्यापीठाचे तुरच्या विविध वाणासह सोयाबीनचे एमएयुएस-१६२ हे वाण
शेतक-यांमध्ये मोठया्प्रमाणात प्रचलित होत असुन यावर्षी कृषि विभागाच्या
सहकार्याने सोयाबीनमध्ये रूंद वरंबा व सरी पध्दतीचा मोठा प्रसार करण्यात आला त्याचा
लाभ शेतक-यांना झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विस्तार
शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी शेतक-यांना दुष्काळास्थितीत दिलासा देण्यासाठी
राबविण्यात येत असलेल्या विद्यापीठाच्या उमेद उपक्रमाची माहिती दिली तर संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी मोसमी संशोधनाबाबत माहिती दिली. शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण यांनी कृषि शिक्षणाबाबत तर कुलसचिव डॉ डी एल जाधव यांनी विद्यापीठाच्या
कार्यक्षेत्र व कार्याबाबत माहिती दिली. याप्रसंगी विद्यापीठाची कृषि दैनंदिनी
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते मा. ना बबनराव लोणीकर यांना भेट
देण्यात आली. याबैठकीस विद्यापीठाचे विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व विभाग
प्रमुख उपस्थित होते.
Friday, January 9, 2015
हवामान बदलाचा राज्यातील शेतीवर मोठा परिणाम.............. डॉ अंजली पारसनीस
वनामकृवित जागतिक मृदा वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
वाढता कार्बन डॉय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड व मिथेन वायु
आदींचे उत्सर्जन हे हवामान बदलाचे मानव निर्मित मुख्य कारण असुन हवामान बदलामुळे
अनियमीत पाऊस व तापमानाचा राज्यातील शेतीवर मोठा परिणाम होत आहे, असे प्रतिपादन द एनर्जी अॅन्ड रिर्सोस इन्स्टिटुटच्या सहयोगी संचालिका
डॉ अंजली पारसनीस यांनी केले.
युनोच्या अन्न व कृषि संस्थेने
२०१५ हे वर्ष जागतिक मृदा वर्ष म्हणुन घोषीत केले असुन त्या निमित्त वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या
वतीने हवामान बदलाचा महाराष्ट्रातील शेतीवर परिणाम’ यावर दि ६ जानेवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात
आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर विस्तार शिक्षण संचालक डॉ
बी बी भोसले, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन
गोखले, सहयोगी अधिष्ठाता (निम्नस्तर
शिक्षण) डॉ डी बी देवसरकर, गोळेगाव कृषि महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ विलास पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ ए एस कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ अंजली पारसनीस
पुढे म्हणाल्या, की
हवामानातील बदलामुळे पीकांवरील किड व रोगांचा प्रादुर्भाव असुन पीकांची उत्पादकतेत
घट होत आहे. पर्जन्यमानाच्या बाबतीत इस्राईलपेक्षा राज्यातील पर्जन्य हे आठ
पटीने जास्त असुन सुयोग्य पाणी व्यवस्थापनाव्दारे पाण्याचा कार्यक्षम वापर करणे
आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय
भाषणास शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी हवामान बदला व शेती यावर मोठया प्रमाणात
संशोधनाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ विलास पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ हरिहर कौसडीकर यांनी व
आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग
प्रमुख, प्राध्यापक व
कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)



