Tuesday, May 14, 2013

म.कृ.वि. परभणी येथे महिलांचे आरोग्‍य व सक्षमीकरण कार्यशाळा कार्यक्रम



म. फुले व भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती कार्यक्रर्मानिमित्‍य गृहविज्ञान महाविद्यालय, म.कृ.वि, परभणी व कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने "महिलांचे आरोग्‍य व सक्षमीकरणासाठी कार्यशाळा आणि हिमोग्‍लोबीन तपासणी" कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. काय्रक्रमासाठी परभणी शहरातील नामवंत नेत्र तज्ञ. डॉ. अर्चना गोरे उपस्थित होत्‍यो. कार्यक्रमात 150 महिला व विद्यार्थीनिंनी सहभाग नोंदवला. गृहविज्ञान महाविद्यालयातील तज्ञामार्फत गृह‍व्‍यवस्‍थापन व आरोग्‍य बाबत कार्यशाळा घेण्‍यात आली. महिलांमध्‍ये हिमोग्‍लागबीनचे महत्‍व व त्‍याचा आरोग्‍याशी संबध यावर सविस्‍तर मार्गदर्शन करण्‍यात आले. ज्‍यांचे हिमोग्‍लोबीन आवश्‍यक प्रमाणात आहे अशा महिलांना "उत्‍कृष्‍ठ आरोग्‍य पुरस्‍काराने" सन्‍मानित करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या, डॉ. विशाला पटनम होत्‍या. कार्यक्रमासाठी डॉ. विजया नलावडे, डॉ. जया बंगाळे, डॉ. माधूरी कुलकर्णी व डॉ. सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्‍यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे यांनी केलें तर सुत्र संचलन प्रा. निता गायकवाड, यांनी केलें. प्रा. अनिस कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी प्रा. मिलींद सोनकांबळे, डॉ. विश्‍वनाथ खंदारे, डॉ. भगवान आसेवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला विद्यार्थिनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या. 

Sunday, May 12, 2013

गृह विज्ञान महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाचे आयोजन


गृह विज्ञान महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाचे आयोजन 

Saturday, May 11, 2013

माती तपासणी शिबीर





मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान व रसायनशास्त्र विभाग व भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा, परभणी च्या वतीने नुकतेच फिरत्या माती प्रयोगशाळे मार्फत कौसडी ता. जिंतूर येथे माती तपासणी शिबीर घेण्यात आले.  यात वाघी, कौसडी, मातीवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी चार गावातील  शेतकऱ्यांच्या मातीचे ३९० नमुने गोळा करण्यात आले. या शिबिराचा समारोप विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण याच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

Friday, May 10, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, गोळेगांव ता. औंढा नागनाथ येथे कृषि महाविद्यालयास शासनाची मान्‍यता



महाराष्‍ट्र शासनाच्‍या मंत्रीमंडळाच्‍या दिनांक 8 मे 2013 रोजी संपन्‍न झालेल्‍या बैठकीत गोळेगांव ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालयास शासनाची मान्‍यता देण्‍यात आली. हिंगोली जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना उच्‍च कृषि शिक्षणाचे दालन उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणुन मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत हिंगोली जिल्‍ह्यातील गोळेगांव ता. औंढा नागनाथ येथे घटक कृषि महाविद्यालय स्‍थापनेचा प्रस्‍ताव महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषिमंत्री मा.ना.श्री.राधाकृष्‍णजी विखे पाटील व कळमनुरीचे आमदार मा.श्री.राजीवजी सातव व मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली शासनाच्‍या मान्‍यतेस्‍तव सादर करण्‍यात आला होता. तसेच यासाठी वसमतचे आमदार मा.श्री.जयप्रकाशजी दांडेगांवकर व हिंगोलीचे आमदार मा.श्री.भाऊराव पाटील गोरेगांवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कुलगुरु डॉ.किशनराव गोरे यांच्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नामुळे महाराष्‍ट्र शासनाने कृषि महाविद्यालय, गोळेगांव ता. औढा नागनाथ येथे 60 विद्यार्थ्‍यांच्‍या प्रवेश क्षमतेसह मान्‍यता दिली आहे. 1972 साली मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्‍थापना गोळेगांव येथे होणार होती, परंतु ते स्‍वप्‍न आज 41 वर्षानंतर शासनाच्‍या सकारात्‍मक निर्णयामुळे कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने पुर्ण झाले आहे.
     या महाविद्यालयासाठी शासनाने एकुण 65 पदांना मंजुरी दिली असुन 28 शिक्षकवर्गीय पदे त्‍यामध्‍ये सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य, सहयोगी प्राध्‍यापक, सहाय्यक प्राध्‍यापक, प्रक्षेत्र अघिक्षक व वसतीगृह अधिक्षक तसेच 37 शिक्षकेत्‍तर कर्मचारी पदे यामध्‍ये सहाय्यक ग्रंथपाल, लघुलेखक, सहाय्यक कुलसचिव, सहाय्यक नियंत्रक, भांडारपाल, वरीष्‍ठ लिपीक, पहारेकरी, प्रयोगशाळा परिचर इत्‍यादी पदांचा समावेश आहे. या पदांसाठी पुढील पाच वर्षासाठी एकुण आवर्ती खर्च रुपये 947.32 लक्ष व अनावर्ती खर्चासाठी रुपये 2918.53 लक्ष अशा प्रकारे एकुण रुपये 3865.85 लक्ष इतक्‍या खर्चाच्‍या प्रस्‍तावास प्रशासकीय व वित्‍तीय मान्‍यता देखील देण्‍यात आली आहे. या महाविद्यालयात चार वर्षाचा बी. एस्‍सी. (कृषि) पदवी अभ्‍यासक्रम शिकविण्‍यात येणार आहे. सदरील अभ्‍यासक्रमात कृषिविद्या, किटकशास्‍त्र, वनस्‍पतीशास्‍त्र विकृतीशास्‍त्र, कृषि अभियांत्रीकी, कृषि अर्थशास्‍त्र, कृषि विस्‍तार शिक्षण, पशु संवर्धन व दुग्‍धशास्‍त्र व्‍यवसाय, कृषि वनस्‍पतीशास्‍त्र, कृषि मृद व रसायनशास्त्र, उद्यानविद्या इत्‍यादी कृषि संबंधीत विषयांचा समावेश राहाणार आहे. यामुळे या परिसरातील‍ विद्यार्थ्‍यांना मोठा लाभ होणार असून त्‍यांच्‍यातील कृषि क्षेत्राच्‍या संदर्भातील गुणांना वाव मिळणार आहे.
     विद्यापीठामार्फत या भागात अनेक पाणलोट क्षेत्र उभारण्‍यात आली आहेत. या महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेमुळे या भागाचा कृषि विकासासाठी अधिक पोषक वातावरण निर्माण होऊन येत्‍या काळात एकुणच जिल्‍ह्याच्‍या विकासात भर पडणार आहे. या महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातून कृषि शिक्षणाबरोबरच संशोधनालाही चालना मिळून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतापर्यंत पोहोचवून शेतक-यांचे प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न होईल. यामुळे जिल्‍ह्यात कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यास चालना मिळवून या भागातील शेती व शेती संलग्‍न क्षेत्राच्‍या विकासासाठी पर्यायाने शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. सोबतच या महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातुन या भागातील विविध पिकांबरोबरच मधुमक्षीका पालण, कोरडवाहू फळपिके, प्रक्रिया उद्योग, बिजोत्‍पादन, शेती पुरक ऊद्योग धंदे इत्‍यादींना निश्‍चीतच चालना मिळणार आहे आणि यातुन या भागातील शेतक-यांची आर्थीक प्रगती होईल असा विश्‍वास वाटतो. कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेनंतरही या भागातील कृषि विकासासाठी मसाले संशोधन केंद्र, औषधी व सुंगधी वनस्‍पती प्रकल्‍प स्‍थापनेच्‍या दृष्‍टीने विद्यापीठाचे प्रयत्‍न सुरू आहेत. एकुणच या महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातून शेतक-यांचा सर्वांगीण प्रगती साधण्‍यासाठी उपयोग होईल.
     हिंगोली जिल्‍ह्यातील शेतक-यांमध्‍ये व जनतेमध्‍ये या महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेमुळे उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले असून राज्‍याचे कृषिमंत्री मा.ना.राधाकृ‍ष्‍ण विखे पाटील, वसमतचे आमदार मा.श्री.जयप्रकाशजी दांडेगांवकर, हिंगोलीच आमदाम मा.श्री.भाऊराव पाटील गोरेगांवकर, कळमनुरीचे आमदार मा.श्री.राजीवजी सातव व मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा.कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे यांचे विविध स्‍तरातुन अभिनंदन करण्‍यात येत आहे. सदरील प्रस्‍तावाचा पाठपुरावा कुलगुरूंच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमंत पाटील यांनी परिश्रम घेतले.

Thursday, May 9, 2013

प्रा यु एन फाटक सेवानिवृत्त


मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या खामगांव जि बीड येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक प्रा यु एन फाटक नुकतेच सेवानिवृत्‍त झाले. त्‍यानिमित्‍त त्‍यांचा विस्‍तार शिक्षण विभागातर्फे सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे अध्‍यक्षस्‍थानी होते. तर डॉ जयश्री एकाळे, डॉ प्रशांत देशमुख, डॉ राजेश कदम, श्री सी एस नखाते, श्री जोशी, श्री खताळ इत्‍यादी उपस्थित होते. प्रा यु एन फाटक यांनी विस्‍तार, शिक्षण व संशोधन या तिन्‍ही क्षेत्रात 32 वर्षे विद्यापीठाच्‍या सेवेत कृषी अधिकारी, सहययक प्राध्‍यापक व सहयोगी प्राध्‍यपक या पदावर कार्य केले. 

Wednesday, May 1, 2013

मराठवाडा़ कृषि विद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्‍पर्धा 2013 चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्‍न

मा. कुलगुरू डॉ.‍ किशनरावजी गोरे व इतर मान्यवरांसोबत क्रिकेट स्‍पर्धेमध्‍ये श्री जी बी उबाळे यांच्‍या नेतृत्‍वाखालील प्रशासकीयअ विजेता संघ 

क्रिकेट स्‍पर्धेमध्‍ये नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या संघाने उपविजेता संघ 

 कब्‍बडी स्‍पर्धेत प्रा. टि. एफ. राठोड यांच्‍या नेतृत्‍वाखालील विद्यापीठ गोल्‍डन विजेता संघ‍ 
    
व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेमध्‍ये श्री अशोक खिल्लारे यांच्‍या नेतृत्‍वाखालील विद्यापीठअ विजेता संघ 

    मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्‍पर्धा 2013 चे आयोजन 27 ते 29 ए‍‍प्रिल 2013 दरम्‍यान करण्‍यात आले होते. या क्रिडा स्‍पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त दि. 1 मे 2013 रोजी मा. कुलगुरू डॉ.‍ किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाला. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, कुलसचिव डॉ. डि. बी. देवसरकर, विद्यापीठ अभियंता श्री डी. डी. कोळेकर, नियंत्रक श्री एन. जे. सोनकांबळे, सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. अशोक कडाळे, डॉ.पि.एन.सत्‍वधर व प्रा.विशाला पटनम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी विजयी संघाना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषक प्रदान करण्‍यात आले. क्रिकेट स्‍पर्धेमध्‍ये श्री जी बी उबाळे यांच्‍या नेतृत्‍वाखालील प्रशासकीयअ संघ विजेता ठरला तर नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या संघाने उपविजेतेपद पटकाविले. व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेमध्‍ये श्री अशोक खिल्लारे यांच्‍या नेतृत्‍वाखालील विद्यापीठअ संघ विजेता, तर प्रा. सचिन मोरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठ-ड संघ उपविजेता ठरला. कब्‍बडी स्‍पर्धेत प्रा. टि. एफ. राठोड यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठ गोल्‍डन हा संघ‍ विजेता, तर प्रा. ई. डी. घ्‍यार यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठ रायडर हा संघ उपविजेता ठरला. तसेच बॅटमिंटन दुहेरी वरिष्‍ठ गटात प्रा. शाहू चव्‍हाण व टि. एफ. राठोड विजेते ठरले तर कनिष्‍ठ गटात श्री राम खोबे व धिरज पाथ्रीकर विजेते ठरले. महिला दुहेरी बॅटमिंटन गटात प्रा. विशाला पट्टनम व डॉ. आशाताई देशमुख विजेत्‍या, तर प्रा. सुनिता पवार व अर्चना घनवट उपविजेत्‍या ठरल्‍या. वैयक्तिक स्‍पर्धेत धावणे या स्‍पर्धेत श्री पि. जी. वागतकर यांनी प्रथम क्रमांक पट‍कविला, तर प्रा. शाहू चव्‍हाण व श्री. राम खोबे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतिय क्रमांक पटकाविला. लांबउडी स्‍पर्धेत श्री पि. जी. वागतकर यांनी प्रथम, तर श्री एस. एस. राठोड व श्री वाय. पी. ठोंबरे यांनी अनुक्रमे द्वितिय व तृतिय क्रमांक पटकाविला. बॅटमिंटन एकेरी पुरुष गटात प्रा. शाहू चव्‍हाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर प्रा. टि. एफ. राठोड व प्रा. बि. व्‍ही. आसेवार यांनी अनुक्रमे द्वितिय व तृतिय क्रमांक पटकाविला. बॅटमिंटन महिला गटात प्रथम पारितोषिक डॉ. आशाताई देशमुख, तर द्वितिय आणि तृतिय क्रमांकाचे पारितोषक रुपाली पतंगे व प्रा. विशाला पट्टनम यांनी पटकाविले. टेबल टेनिस पुरूष गटामध्‍ये प्रथम व द्वितीय पारितोषक अनुक्रमे डॉ. प्रशांत करंजीकर व श्री सतिष जाधव यांनी, तर महिला गटात डॉ. आशाताई देशमुख व डॉ. मेघा सुर्यवंशी यांनी पटकाविला. कॅरम पुरुष गटामध्‍ये प्रथम, द्वितिय व तृतिय पारितोषक अनुक्रमे श्री प्रेशित चव्‍हाण, श्री अमोर सोनकांबळे व प्रा. शिवकुमार सरसर तर महिला गटात कु.अश्विनी बेदरे, प्रा.सुनिता पवार, साधना उमरीकर यांनी पटकाविला. बुध्‍दीबळ स्‍पर्धेत श्री.डि.व्‍ही.राऊत यांनी प्रथम, तर द्वितिय व तृतिय क्रमाकांचे पारितोषिक अनुक्रमे प्रा.डि.के.झाटे व श्री.व्हि.टी.मुकाडे यांनी पटकाविले. रांगोळी स्‍पर्धेत प्रथम, द्वितिय व तृतिय क्रमाकांचे पारितोषक अनुक्रमे डॉ.मेघा सुर्यवंशी, डॉ.मीना वानखेडे व कु.ममता पतंगे यांनी पटकाविले. संगीत खुर्ची स्‍पर्धेत डॉ.पपिता गौरखेडे, डॉ.मेघा सुर्यवंशी व अर्चना घनवट यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितिय व तृतीय पारितोषिक पटकाविले. या क्रिडा स्‍पर्धेप्रसंग्री घेण्‍यात आलेल्‍या सांस्‍कृतिक कार्यक्रमात भक्तिगीत स्‍पर्धेत प्रा. मंदकुमार सातपुते, प्रा. मेघा उमरीकर आणि चित्रा बेलूरकर यांनी प्रथम, द्वितिय व तृतिय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्‍त केले. तसेच सिनेगीत स्‍पर्धेत प्रथम, द्वितिय व तृतिय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे श्री उदय वाईकर, श्री विजय सावंत व डॉ. आशाताई देशमुख यांनी पटकाविले.
      या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात मा.डॉ.के.पी.गोरे म्‍हणाले की, या क्रिडा स्‍पर्धेमुळे विद्यापीठ कर्मचा-यामध्‍ये आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांनी नियमीतपणे खेळ-खेळावेत म्‍हणजे त्‍यामुळे आत्‍मविश्‍वास व चिकाटी निर्माण होते तसेच कार्यक्षमतेत वाढ होते. या स्‍पर्धेत कामगारापासून ते मोठ्या अधिका-यांपर्यंत सहभाग नोंदवून एकजुटीचा आदर्श निर्माण केला. या एकजुटीने विद्यापीठ कोणतेही कार्य यशस्‍वीरित्‍या पुर्ण करु शकतो असे उदगार मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांनी आपल्‍या भाषणात काढले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. के. टी. आपेट यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे व श्री अशोक खिल्‍लारे तर आभार प्रदर्शन श्री शाहु चव्‍हाण यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ ए के गोरे, डॉ महेश देशमुख, प्रा गडदे, श्री एस एस खताळ आदीसह सर्व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले. तसेच पंच म्हणून श्री भालचंद्र पवार, महेश काळदाते, शरद हिवाळे तर समालोचक म्हणून श्री आबा शिंदे यांनी सहकार्य केले. या प्रसंगी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 


53 वा महाराष्‍ट्र दिन उत्‍साहात साजरा

महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे भाषण करतांना 
महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांच्या हस्ते अपंग कर्मचा-यांना व अधिका-यांना त्‍यांचे कार्यालयीन कर्तव्‍य व जबाबदा-या पार पाडण्‍यासाठी अपंगकत्वावर मात करण्यास मदत करणारी सहायक उपकरणे वाटप करतांना 
 महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त सन 2012-13 या वर्षात विद्यापीठाच्‍या सेवेत प्रशसंनीय कामगीरी केल्‍याबददल अधिकारी व कर्मचारी यांना मा. कुलगुरू यांच्‍या हस्‍ते प्रशस्‍तीपत्र देण्‍यात आले

      मराठवाडा कृषि विद्यापीठात 53 व्‍या महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त मा.कुलगुरू डॉ.किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुलसचिव डॉ. डि. बी. देवसरकर, विद्यापीठ अभियंता श्री डि. डी. कोळेकर, नियंत्रक श्री. बी. जे. सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी केलेल्‍या भाषणात कुलगुरू मा डॉ. किशनरावजी गोरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्‍त विद्यापीठ कर्मचा-यांना व त्‍यांच्‍या कुटूंबियांना शुभेच्‍छा दिल्‍या. महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त सन 2012-13 या वर्षात विद्यापीठाच्‍या सेवेत प्रशसंनीय कामगीरी केल्‍याबददल अधिकारी व कर्मचारी यांना मा. कुलगुरू यांच्‍या हस्‍ते प्रशस्‍तीपत्र देण्‍यात आले. तसेच शासन निर्णयानुसार विद्यापीठातील अपंग कर्मचा-यांना व अधिका-यांना त्‍यांचे कार्यालयीन कर्तव्‍य व जबाबदा-या पार पाडण्‍यासाठी अपंगकत्वावर मात करण्यास  मदत करणारी सहायक उपकरणे वाटप करण्‍यात आली. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्‍येने उ‍पस्थित होते.