माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
लोकमान्य बाळ गंगाधर
टिळक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
येथे गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता
अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या
कार्याला विनम्र अभिवादन केले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात
संपन्न झाला.
यावेळी संशोधन
संचालक डॉ. भगवान आसेवार,
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव
श्री. पुरभा काळे तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस
पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमात
लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मिती, स्वातंत्र्यलढा, शिक्षण आणि समाजजागृतीतील अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यात आले. उपकुलसचिव
(सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या
जीवनकार्याचा व राष्ट्रसेवेतील योगदानाचा परिचय उपस्थितांना करून दिला.

.jpeg)
