वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालय,
परभणी येथे दिनांक १ जुलै २०२६ रोजी स्व. वसंतराव नाईक जयंती निमित्ताने
कृषि दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके उपस्थित होते. त्यांनी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते तथा कृषि विकासाचे
दूरदर्शी नेते स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषि, सिंचन,
जलसंधारण, ग्रामीण विकास व शेतकरी कल्याणासाठी
केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
दरवर्षी १ जुलै रोजी कृषि दिन साजरा केला जातो, असे सांगून कृषि
दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच पर्यावरण संवर्धन, हवामान
बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाची गरज, जैवविविधतेचे
संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने किमान
एक वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
त्यानंतर त्यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी
महाविद्यालयात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक
तसेच विद्यार्थीनी यांच्या हंस्ते वृक्षालागवड करण्यात आली. लावलेल्या वृक्षाची
संगोपन करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांना देण्यात आली.
या कार्यक्रमास
विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. रघुनाथ
जायभाये, डॉ. पंडित
मुंडे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. प्रमोदीनी
मोरे, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे, इंजी.
शिवणकर, डॉ. गजानन वसू, डॉ. अश्विनी
गावंडे तसेच कर्मचारी, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे
स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
प्रस्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे
यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी राधेशाम खटींग, सतेज मेटकर, कुनाल गडाख, राम
शेडंगे, आभिमन्यु घूगे, गणेश बोराडे, संकेत पवार, मोदीता इंगळे, दुधाटे गीता तसेच, श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड , श्री.
जितेंद्र खिल्लारे, श्री.
रमेश मोहीते व श्री. माणिक खटींग इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.


.jpeg)
