महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे
प्रणेते व कृषी विकासाला नवी दिशा देणारे स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त
साजऱ्या करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त दिनांक १ जुलै २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
झाला. यावेळी विद्यापीठ परिसरात विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा
संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त स्व.
वसंतराव नाईक यांच्या कृषी विकासाच्या दूरदृष्टीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून
प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून
वृक्षलागवड हीच भावी पिढ्यांसाठी खरी गुंतवणूक असल्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी
दिला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी
अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे
कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी केले.
यावेळी डॉ. अंशुल लोहकरे, डॉ. अमोल भोसले,
डॉ. राहुल बघेले, डॉ. सय्यद शबनम, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. सुबोध खंडागळे, डॉ. आशा सातपुते, डॉ. अर्चना घनवट, डॉ. कल्याणी देशमुख, डॉ. महेश, श्री. भुसारी तसेच इतर प्राध्यापक,
कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
व्यक्त केला.



