Friday, July 17, 2026

वनामकृविच्या गोळेगाव कृषि महाविद्यालयाद्वारे भेंडेगाव येथे लंपी त्वचा रोग प्रतिबंधक लसीकरण; पशुपालकांना दिलासा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत गोळेगाव कृषि महाविद्यालयाद्वारे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) व कृषि औद्योगिक संलग्नता (AIA) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी भेंडेगाव (ता. वसमत) येथे लंपी त्वचा रोग प्रतिबंधक लसीकरण अभियान यशस्वीपणे राबविले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लंपी विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा कार्यक्रम नुकताच सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बंडू व्यवहारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कोरडे उपस्थित होते. यावेळी डॉ. शंकर नरवाडे यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व शेळीपालन स्वीकारावे, तसेच जनावरांचे वेळेवर लसीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. राठोड यांनी लंपी त्वचा रोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचार तसेच शेतकऱ्यांमधील गैरसमज दूर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी डॉ. गोडबोले यांच्यासह गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यावर जाऊन सुमारे २० गाईंचे लंपी त्वचा रोग प्रतिबंधक लसीकरण केले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक स्वामी, नानाराव व्यवहारे, बाबाराव सोनटक्के, अर्जुन व्यवहारे, रामदास व्यवहारे, मारुती सोनटक्के, दिगंबर बोराडे, कल्याण कोल्हे, सुभाष सोनटक्के, देविदास सोनटक्के, चंद्रकांत तटीकुंडलवार यांच्यासह ग्रामस्थ व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल भालेराव, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रवीण राठोड आणि डॉ. विद्यानंद मनवर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गमे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रुपेश लोखंडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विकी बोडके, रोहित भालेराव, गंगाधर पावडे, उमेश केंद्रे, ओमकार रनेर, महेश देशमुख, ज्ञानेश्वर जाधव, आकाश पैडाकुलवार, ओमकार गरड, वैष्णवी घाटूळ, जान्हवी चव्हाण, शिवकन्या कुकर, गायत्री नादरे व पूजा इंगळे या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.