वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यापीठाच्या मुख्य प्रागंणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद
वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव श्री. दिलीप कच्छवे तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,
विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय छात्र
सेनेच्या छात्रसैनिकांनी कुलगुरूंना सलामी दिली. कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Tuesday, August 16, 2016
Monday, August 8, 2016
सद्यपरिस्थितीत घ्यावयाची खरीप पिकांची काळजी
मराठवाडयात
सध्या सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत असुन सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अशा
वातावरणाचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. पिकांवर किडी व
रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसुन येतो, अशा परिस्थितीत शेतक-यांनी पुढील प्रमाणे खरीप पिकांची
काळजी घेण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ.यू.एन.
आळसे व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ प्रा.डी.डी. पटाईत यांनी केले आहे.
1. मुग व उडीद या पिकांवर भुरी रोगाच्या
नियंत्रणासाठी 300
अंश गंधकाची भुकटी प्रती हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुराळावी
किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
2. कपाशीमध्ये पावसाचे पाणी शेतात साचुन
राहीले असल्यास दोन ओळीत ठरावीक अंतरावर सरी काढून पावसाचे पाणी शेताबाहेर काढून
दयावे म्हणजेच निच-याची व्यवस्था करावी.
3. जास्त पावसामुळे पाणी साठलेल्या ठिकाणी
कपाशीच्या झाडाची वाढ खुंटून सुरवातीला पाने पिवळी पडतात व नंतर लाल होऊन मरायला
लागतात. अशावेळी 10 लिटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया व 150 ग्रॅम पोटॅश व त्यासोबत कॉपर ऑक्झीक्लोराईड 30
ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून ड्रेचिंग (आळवणी) करावी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम अधिक
कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम 10 लिटर
पाण्यात मिसळून ड्रेचींग (आळवणी)
करावी. यासाठी निचरा करुनच ड्रेचींग करावी.
4. कपाशीमध्ये रसशोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव
आढळुन आल्यास अॅसीफेट 75 टक्के 15 ग्रॅम किंवा थायामिथॉक्झाम 3 ग्रॅम किंवा फलोनीकॅमीड 50 टक्के 2 ग्रॅम किंवा असिटामाप्रीड 20 टक्के 3 ग्रॅम किंवा मिथिलडिमेटॉन २५ टक्के 8 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
5. सोयबीन पिकाची पाहणी केली असता असे आढळुन
आले की, सोयबीनवर रिमझिम पाऊस
सततचे ढगाळ वातावरण यामुळे उंटअळी या किडीसोबतच कोंडिका इलेकटा या पाने खाणा-या
अळीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन आला आहे. त्यासोबतच ब-याच ठिकाणी चक्रीभुंगा
या किडीच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली आहे. ही किड सोयबीनच्या खोडाला, फांदीला किंवा पानाच्या देठाला दोन खापा करुन त्यामध्ये अंडी घालते.
त्यामुळे खापेच्या वरचा भाग सुकुन वाळलेला दिसतो. अंडयातुन अळी निघाल्यानंतर ती
पानाचे देठ व खोड आतुन पोखरते व खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे अशा झाडाला शेंगा
कमी लागतात व लागलेल्या शेंगा भरत नाहीत. तसेच पिक काढणीच्यावेळी खापा केलेल्या
जागुन खोड तुटुन पडते व त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशावेळी
चक्रीभुंग्याचा व पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोफेनोफॉस 50 टक्के 20 मिली किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के 13 मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 टक्के 3 मिली. प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारावे. पावर पंपाकरिता किटकनाशकाचे प्रमाणे 3 पट करावे.
6. फुले लागल्यानंतर सोयबीनमध्ये तणनाशकाचा
वापर करु नये. तसेच कळया व फुले लागल्यानंतर सोयबीनमध्ये अतिरिक्त युरियाचा
वापर टाळावा.
![]() |
| सोयाबीन वरील चक्रीभुंगा |
Saturday, August 6, 2016
माती तपासणीबाबतच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग राज्यशासन यांच्या संयुक्त
विद्यमाने मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात पाच दिवसांचे राज्यस्तरीय माती
तपासणी या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक 5 जुलै रोजी संपन्न झाला. समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके तर विभाग
प्रमुख तथा प्रशिक्षणाचे संचालक डॉ. व्हि.डी. पाटील, प्रा. डॉ. सय्यद ईस्माईल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके आपल्या भाषणात म्हणाले की, माती परिक्षणाधारे खतांचा मात्रा दिल्यास शेतक-यांचे
उत्पादन वाढण्याबरोबरच अनावश्यक खतांचा वापर कमी होतो, यासाठी मातीचा नमुना योग्यरित्या गोळा करणे व प्रयोगशाळेत नमुन्याचे पृथकरण
करुन शेतकऱ्यांना खतांची शिफारस पत्रिका वितरीत करणे
यामध्ये अशा प्रशिक्षणाचा उपयोग होतो. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ व्ही डी पाटील यांनी माती परिक्षाणाचा उपयोग
जमिनीचे आरोग्य्ा विषयक समस्यांची उकल करण्याकरीता प्रशिक्षणांर्थींनी करावा, असे आवाहन केले. प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणाचा अनुभव मनोगताव्दारे
व्यक्त केला. तर मान्यवरांच्या
हस्ते प्रशिक्षनार्थींना प्रशिक्षण
प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ
सुरेश वाईकर यांनी केले. सुत्रसंचलन डॉ पपिता गौरखेडे व आभार प्रदर्शन डॉ महेेश देशमुख यांनी केले. सदरिल प्रशिक्षण विभाग प्रमुख तथा
प्रशिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सुरेश वाईकर यांनी प्रशिक्षण समन्वयक म्हणुन काम पाहीले. प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील आठही जिल्हातील आठरा तंत्र अधीकारी व तंत्रज्ञ,
कृषि सहाय्यक यांनी सहभाग नोदंविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक,
डॉ. सदाशिव अडकीणे, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, प्रा. अनिल मोरे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केलेे. कार्यक्रमास
महाविद्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक व पदव्यत्तर विद्यार्थी यांची
उपस्थीती होती.
Friday, August 5, 2016
मौजे जांब येथे कृषिदूतांमार्फत पशुलसीकरण मोहीम
परभणी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांचा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीक
सोयाबीन संशोधन प्रकल्प येथे कार्यरत असलेल्या परभणी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण
कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी मौज जांब येथे दि. 4 ऑगस्ट रोजी
सार्वजनिक पशु लसीकरण मोहीम आयोजित केली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले हे उपस्थित होते तर उपसरपंच श्री. अजय जामकर, पशुवैद्यकीय
अधिकारी डॉ. वि उ
कावळे, प्रकल्प प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेत्रे, विभाग प्रमुख डॉ बी एम
ठोंबरे, कार्यक्रमाधिकारी डॉ एस एल बडगुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शनात
प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी गावातील पशुपालकांना जनावरांचे नियमीत लसीकरण
करून घेण्याचे आवाहन केले. डॉ. बी एम ठोंबरे यांनी पशुंच्या लसीकरणाचे महत्व विशद
केले तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वि उ कावळे यांनी पशुंचे लाळ खुरकत व घटसर्प आदी
रोगांच लसीकरण केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एल. बडगुजर यांनी केले.
सुत्रसंचालन कृषिदूत अक्षय कर्डीले यांनी तर गणेश काळे यांनी आभार मानले. लसीकरण
मोहीमे अंतर्गत गावातील दिडशे पेक्षा जास्त जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वतीसाठी कृषिदूत म्हणून प्रकाश गोरे, स्वप्निल मुनेश्वर, सागर
जगधने, गजानन जाधव, गजानन हरके, तोशिब मोगल, गणेश काळे, शाम कच्छवे आदीसह शेतकरी बांधवांनी परिश्रम
घेतले.
Tuesday, August 2, 2016
पाच दिवसीय माती तपासणी व विश्लेषण या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
आणि
विभागीय कृषि विस्तार
व्यवस्थापन आणि प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात दिनांक 1 ते 5 ऑगस्ट
दरम्यान पाच दिवसांचे राज्यस्तरीय माती तपासणी व विश्लेषण या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
असुन दिनांक 1 ऑगस्ट रोजी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर
प्राचार्य डॉ. विलास पाटील, रामेती प्राचार्य श्री. उदय नलावडे, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश वाईकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन
करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्हणाले की, माती तपासणी प्रयोगशाळेत कार्य करण्यासाठी महिलांना मोठी
संधी आहे. प्रयोगशाळेतील नियोजन आणि बारकावे याचे ज्ञान महिलांना मुळातच अवगत असते. प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी
जमिनीच्या गुणधर्मांचा व इतर अन्नद्रव्यांचा असलेला
परस्पर संबंध आणि त्यांचे माती परीक्षणातील महत्व यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ. सुरेश वाईकर यांनी प्रशिक्षणाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपिता गौरखेडे तर आभार डॉ. महेश देशमुख यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणात कृषि विभागाच्या प्रयोगशाळेतील विविध अधिकारी व कर्मचारी यांना प्रयोगशाळेत माती तपासणी व विश्लेषण प्रशिक्षणव्दारे शिकवले जाणार असुन जमिनीच्या विविध गुणधर्मांचे बौधिक व प्रात्यक्षिकाव्दारे माहीती देण्यात
येणार आहे. प्रशिक्षणासाठी मराठवाड्यातील कृषि विभागातुन आठ जिल्हातील वीस अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी
सहभाग नोंदविला आहे. प्रशिक्षणाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
असुन या लाभ मृद परिक्षण अधिकारी व पर्यायाने मराठवाडा विभागातील शेतकरी बांधवाना फायदेशीर ठरणार आहे. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ अनिल धमक, प्रा. गलांडे, प्रा. प्रभाकर अडसुळ, डॉ. सदाशिव अडकीणे, इतर कर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी सहकार्य केलेे. कार्यक्रमास विभाग प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
Subscribe to:
Posts (Atom)



