Thursday, February 16, 2017

छत्रपतीच्‍या स्‍वराज्‍यात जलसंधारणाचे चांगले नियोजन होते..... अॅड. गणेश हलकारे

वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयात छत्रपती शिवजयंती उत्‍सव २०१७ चे आयोजन
छत्रपतींच्‍या स्‍वराज्‍यात शेतक-यांच्‍या हिताचे रक्षण केले जात असे. शिवरायाच्‍या राज्‍यात कोडरवाहु शेतीचा मोठा भाग होता, जलसंधारणाचे चांगले नियोजन केले गेले होते. आजच्‍या युवकांनी शिवचरित्राचा तटस्‍थ अभ्‍यास करणे गरजेचे आहे. आज प्रगत तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतकरी शेतमालाचे चांगले उत्‍पादन घेत आहेत, शेतकरी उत्‍तम उत्‍पादक आहे, परंतु शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढले नाही. कारण शेतकरी उत्‍तम व्‍यापारी होऊ शकला नाही. उत्‍पादन खर्चावर आधारी शेतमालाला भाव मिळल्‍याशिवाय ही स्थिती बदलणार नाही, शेतीला उद्योगाचा दर्जा देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमरावतील येथील प्रख्‍यात व्‍यक्‍ते अॅड. गणेश हलकारे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक १५ फेब्रुवारी रोजी आयोजित व्‍याख्‍यानाच्‍या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर व्‍यासपीठावर सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ ए एस कदम, विभाग प्रमुख डॉ टि बी तांबे, डॉ आर डि आहिरे, डॉ ए एस कार्ले, विद्यार्थी प्रतिनिधी अमोल पवार, रवि सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. गणेश हलकारे पुढे म्‍हणाले की, शिवाजी राजे उत्‍तम प्रशासक, व्‍यवस्‍थापक, रणधुरंदर, मुत्‍सद्दी होते. त्‍यांच्‍या स्‍वराज्‍यात जातीधर्मास थारा नव्‍हता. सर्व जातीधर्माचे लोक त्‍यांच्‍या प्रशासनात व सैन्‍यात होते. आजही त्‍यांच्‍या विचारांची गरज असुन जातीभेद मानणारा देश कधीही महासत्‍ता होऊ शकत नाही.
अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी राजे शिवाजी यांचे शेतक-यांच्‍या कल्‍याणाकडे आपल्‍या स्‍वराज्‍यात विशेष लक्ष होते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर डि आहिरे यांनी केले तर प्रमुख व्‍यक्‍त्‍याचा परिचय डॉ मेधा सुर्यवंशी हिने करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ ए एस कार्ले यांनी तर आभार स्‍वप्‍नील भोसले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, February 14, 2017

चाकुर (लातुर) येथील कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन पदव्‍युत्‍तर संस्थेत माजी विद्यार्थ्‍यीच्‍ाा मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या चाकुर (लातुर) येथील कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन पदव्‍युत्‍तर संस्थेत माजी विद्यार्थ्‍यीच्‍या मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य प्रा हेमंत पाटील यांच्‍या हस्‍ते झाले तर समारोप शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थित संपन्‍न झाला. दोन दिवस चालेल्‍या या मेळाव्‍यात महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या करिअर मधील अनुभव सांगुन भविष्‍य विविध क्षेत्रातील संधीबाबत उपस्थित विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्‍या वतीने रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते, यात विद्यार्थ्‍यांनी रक्‍तदान केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्‍यी संघटनेचे अध्‍यक्ष अमोल दौने यांनी मनोगत व्‍यक्‍त करून आभार प्रदर्शन केले. तसेच धारवाड कृषि विद्यापीठात आचार्य पदवीसाठी शिक्षण घेत असलेली माजी विद्या‍र्थ्‍यींनी ज्‍योती हिनेही मार्गदर्शन केले. सदरिल महाविद्यालयाची स्‍थापना २००९ साली झाली असुन प्रथमच माजी विद्यार्थ्‍यांच्‍या मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली अधिकारी, प्राध्‍यापक व विद्या‍र्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

Thursday, February 9, 2017

मराठवाडयात ऊस लागवडीकरिता ठिबक सिंचन पध्‍दतीचाच वापर करावा....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
मराठवाडयात कोरडवाहु क्षेत्र मोठया प्रमाणात असुन शेतक-यांनी ऊस लागवडीकरिता ठिबक सिंचनाच वापर करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव येथील शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, डॉ. बी. व्ही. आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी शेतीमधील पालापाचोळा जाळु नये, यामुळे पर्यावरणाचा -हास होतो, त्‍याचा खत म्‍हणुन वापर करावा. विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती उत्पन्न वाढवावे, असे नमुद केले.
प्रशिक्षणात ऊस लागवड तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, हरभरा लागवडीवर डॉ. यु. एन. आळसे, कोरडवाहू शेती लागवड तंत्रज्ञानावर डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी, कापुस लागवडीवर डॉ. ए. जी. पंडागळे यांनी तर हुमणी किड व्यवस्थापनावर प्रा. डी. डी. पटाईत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डी. डी. पटाईत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. जी. पुरी यांनी मानले. याप्रसंगी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विस्तार शिक्षण अधिकारी प्रा. पी. एस. चव्हाण हे उपस्थित होते. प्रशिक्षणात परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. यु. एन. आळसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. जी. पुरी, प्रा. डी. डी. पटाईत, के. डी. कौसडीकर, एस. बी. जाधव, सुदर्शन बोराडे, हनुमान बनसोडे, गणेश कटारे, एकनाथ डिकळे, मुरलीधर शिंदे, दिपक वाघ आदींनी परिश्रम घेतले.

कृषि विद्यापीठातील मनुष्‍यबळाच्‍या कौशल्‍य विकासासाठी प्रशिक्षणावर भर द्यावा लागेल.......कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने आयोजित राज्यस्तरीय एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
कोणत्‍याही संस्‍थेचे भविष्‍य हे संस्‍थेतील उपलब्‍ध मनुष्‍यबळावर अवलंबुन असते, कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांचे ज्ञान अद्यावत करण्‍यासाठी व कौशल्‍य विकासासाठी वेळोवेळी प्रशिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने मृदापिकजल, अन्न, चारा संशोधन व अद्यावत परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकासया विषयावरील राज्यस्तरीय एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपाप्रसंगी (दिनांक ९ फेब्रुवारी) ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. के. पाटील हे उपस्थित होते तर राजेंद्रनगर (हैद्राबाद) येथील माजी शिक्षण संचालक डॉ पी. चंद्रशेखरराव, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, बदलत्या हवामानानुसार शिक्षण व संशोधन क्षेत्रात कार्यात व विविध शाखेतील प्रयोगशाळा सुसज्य करण्यासाठी सदरिल प्रशिक्षणातील ज्ञानाचा विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांना उपयोग होईल.
माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. के. पाटील आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले कीआज अन्नधान्य सुरक्षेतेसाठी कार्य करतांना कृषि शास्त्रज्ञांनी प्रशिक्षणातील ज्ञानाचा उपयोग करावा. शेतक-यांची कृषिक्षेत्रातील समस्‍या सोडविण्‍यासाठी विविध विषयात आंतरशाखीय प्रशिक्षणाची गरज असुन सदरिल प्रशिक्षणाच्‍या आयोजनाबाबत कौतुक केले.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले तसेच प्रशिक्षनार्थींनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण मान्यंवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक प्रशिक्षणाचे आयोजक तथा विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. प्रशिक्षणा देशातील नामांकित संस्थामधील शास्त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), श्रीचौरे (मुंबई), डॉ. व्हि. के. खर्चे, डॉ काटकर (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी), डॉ के. डी. पाटील तसेच विद्यापीठ तज्ञांंनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा शिक्षण व संशोधन क्षेत्रातील ३० शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, February 7, 2017

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक ९ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या प्रशिक्षणात ऊस लागवड तंत्रज्ञान, कोरडवाहु शेती व्‍यवस्थापन, हुमणी किड व्‍यवस्‍थापन, कापसावरील शेंदरी अळीचे व्‍यवस्‍थापन, हरभरा काढणी व प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. यात ऊस लागवड तंत्रज्ञानावर विशेष मार्गदर्शन पाडेगाव येथील मध्‍यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे डॉ धर्मेंद्रकुमार फाळके हे करणार आहेत. प्रशिक्षणाचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते होणार आहे, तरी सदरिल प्रशिक्षणाचा लाभ परिसरातील शेतक-यांनी घ्‍यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे यांनी केले आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्‍यासाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या ०२५४२-२२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर दिनांक ८ फेब्रुुवारी दुपारी ५.०० वाजेपर्यंत आपली नावनोंदणी करावी, असे कळविण्‍यात आले आहे.

Saturday, February 4, 2017

बाजारपेठेची खात्री करूनच दर्जेदार औषधी वनस्‍पतीचे शेतक-यांनी उत्पादन घ्यावे......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवड व उपयोगया विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्‍न

राज्‍यात आयुर्वेद उपचार पध्‍दतीचा लोकांत उपयोग वाढत आहे, आयुर्वेद उपचारासाठी दर्जेदार औषधी वनस्‍पतीची मागणीही वाढत आहे. शेतक-यांनी औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवड करण्‍यापुर्वी बाजारपेठाचा विचार करूनच लागवड करावी. राज्‍यात कोरडवाहु क्षेत्र मोठे असुन कोरडवाहु क्षेत्रात येणा-या औषधी व सुगंधी वनस्‍पतींची निवड शेतक-यांना करावी लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व पुणे येथील महाराष्‍ट्र राज्‍य फलोत्‍पादन व औषधी वनस्‍पती मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक ३ फेब्रवारी रोजी औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवड व उपयोगया विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्‍हणुन पुणे येथील फलोत्‍पादन व औषधी वनस्‍पती मंडळाचे संचालक मा. डॉ एस एल जाधव हे उपस्थित होते, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डी एन गोखले, विभाग प्रमुख डॉ डी बी देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी औषधी वनस्‍पतीची लागवडीपुर्वी प्रत्‍यक्ष आयुर्वेदतज्ञ, आयुर्वेद औषधी निर्माते व प्रक्रिया उद्योजक यांच्‍याशी प्रत्‍यक्ष भेट घेऊनच निर्णय घ्‍यावा. क्‍लस्‍टर पध्‍दतीने गटशेतीच्‍या माध्‍यमातुन औषधी वनस्‍पतीची लागवड व विपणन करण्‍याचा सल्‍लाही शेतक-यांना दिला.  
संचालक मा. डॉ एस एल जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, देशात दर्जेदार औषधी वनस्‍पतीची मागणी वाढत आहे, राज्‍यात आपल्‍या वातावरणात येणा-या औषधी वनस्‍पतीचे क्षेत्र वाढविणे शक्‍य आहे. या वनस्‍पती लागवड व साठवणुक शास्‍त्रशुध्‍दपणे करणे गरजेचे आहे. महाराष्‍ट्र राज्‍य फलोत्‍पादन व औषधी वनस्‍पती मंडळ राज्‍यात विविध कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन औषधी व सुगंधी वनस्पतीच्‍या लागवडीसाठी शेतक-यांना प्रोत्‍साहित करत आहे. यापासुन मुख्‍य पीकासोबतच अतिरिक्‍त उत्‍पादनाचे साधन शेतक-यांना प्राप्‍त होऊ शकते.  सदरिल वनस्‍पतीच्‍या लागवाडीसाठी शासकिय अनुदानाचीही सोय आहे.

शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनीही आपले मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमात सर्पगंधा लागवड तंत्रज्ञानावर घडीपत्रिकेचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विमोजन करण्‍यात आले. सदरिल कार्यशाळेत गुगळ, अश्‍वगंध, सर्पगंधा, चंदन, शतावरी लागवड व उपयोग याविषयावर आयुर्वेद तज्ञ डॉ वैशाल महाजन, आयुर्वेद तज्ञ डॉ कौसडीकर, वनश्री पुरस्‍कार प्राप्‍त श्री महेंद्र घोगरे, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एल एन जावळे, डॉ डि जी दळवी, डॉ अशोक जाधव, डॉ विजया पवार, डॉ के व्‍ही देशमुख आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ डी बी देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा एस एस शिंदे यांनी केले तर आभार डॉ. एल एन जावळे यांनी मानले. कार्यक्रमास मराठवाडयातील प्रगतशील शेतकरी, आयुर्वेद औषधी निर्माते, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Friday, February 3, 2017

वनामकृविच्‍या कर्मचा-यांच्‍या वतीने ऊरूसानिमित्‍त संदलचे आयोजन

परभणी येथील प्रसिध्‍द हजरत सयद शाह तुराबुल हक यांच्‍या ऊरूसानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचा-यांच्‍या वतीने दि २ फेब्रुवारी रोजी संदल काढण्‍यात आला. या संदलचा प्रारंभ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुल‍सचिव डॉ विलास पाटील, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, दाऊद खान, मोईनभाई, याकुब अली, जाफर अली आदी उ‍पस्थित होते.