Wednesday, October 28, 2026

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना ‘इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

 


भारत सरकारच्या वतीने आयोजित ‘इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (ESTIC) २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन दिनांक २७ ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे करण्यात आले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रातील उदयोन्मुख संशोधनाला प्रोत्साहन देणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देणे तसेच देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहित करणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

या परिषदेच्या उद्घाटन समारंभास भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान माननीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांचाही या परिषदेत सहभाग आहे.

या प्रतिष्ठित परिषदेस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले.

परिषदेत विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासाला गती देण्यासंदर्भात विविध विषयांवर विचारमंथन करण्यात येत आहे. विशेषतः कृषि क्षेत्रातील संशोधन, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत शेती पद्धती आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून कृषि क्षेत्राच्या विकासासाठी नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठांना विशेष महत्त्व आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना या प्रतिष्ठित परिषदेसाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि तंत्रज्ञानविषयक कार्याला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या परिषदेमुळे देशातील विविध वैज्ञानिक संस्था, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याबरोबरच ज्ञान, अनुभव आणि संशोधनविषयक विचारांची देवाणघेवाण करण्यास मदत होत आहे.








For English

VNMKV Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani Invited as Special Guest to the Emerging Science, Technology and Innovation Conclave (ESTIC) 2026

 

The Emerging Science, Technology and Innovation Conclave (ESTIC) 2026, a prestigious national-level conference organized by the Government of India, is being held from October 27 to 29, 2026, at Bharat Mandapam, New Delhi. The primary objectives of the conclave are to promote emerging research in science, technology and innovation, encourage the adoption of advanced technologies, and foster innovative ideas for the country's development.

The inaugural ceremony of the conclave was graced by the Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi ji, as the Chief Guest. Dr. Jitendra Singh, Hon’ble Union Minister of State (Independent Charge) for Science and Technology and Earth Sciences, is also participating in the conclave.

Prof. (Dr.) Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Parbhani, has been invited as a Special Guest to this prestigious national-level event.

The conclave provides a platform for deliberations on various aspects of accelerating national development through science, technology, research and innovation. In particular, such national-level platforms are significant in exploring new opportunities for agricultural development through research, the effective application of digital technologies, sustainable farming practices and modern scientific approaches.

The invitation to Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani as a Special Guest offers VNMKV an opportunity to represent its academic, research and technological contributions at the national level. The conclave also facilitates interaction with leading scientific institutions, researchers and technology experts from across the country, promoting the exchange of knowledge, experiences and research perspectives.