Monday, October 26, 2026

वनामकृवित महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

 कुलसचिव श्री. पुरभा काळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. पुरभा काळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याची व योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांचे स्मरण करून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी तसेच महिला कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.