Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Thursday, June 21, 2018
Wednesday, June 20, 2018
वनामकृवित क्रॉपसॅप अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
बोंडअळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र पॅटर्न निर्माण व्हावा....विस्तार शिक्षण संचालक
डॉ. प्रदिप इंगोले
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचा किटकशास्त्र विभाग व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त
विद्यामाने "कापूस, सोयाबीन, तूर व हरभरा पिकावरील कीड-रोग व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प" (क्रॉपसॅप) अंतर्गत मराठवाडयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालूका कृषि अधिकारी, विद्यापीठातील जिल्हा समन्वयक व मास्टर ट्रेनर्स यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम दि. 18 व 19 जुन रोजी संपन्न झाला.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार
शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, लातुरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रमेश भताने, किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बाळासाहेब शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले म्हणाले की, खरिप पिकांतील किड व रोगाचा प्रार्दुभाव अचुक
सर्वेक्षणाने ओळखुन वेळीच उपाय योजनेबाबत शेतक-यांना कृषि विभाग व कृषि विद्यापीठ मार्गदर्शन
करावे. कपाशीतील बोंडअळी व्यवस्थापनासाठी किडींचे अचूक सर्वेक्षण विशेष महत्व असुन यात कामगंध सापळयांचा प्रभावी वापर करावा. किड व्यवस्थापनात क्रॉपसॅप
प्रकल्पाच्या माध्यमातुन सर्वांच्या सहकार्यातुन महाराष्ट्राचा स्वत:चा पॅटर्न तयार व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी येत्या हंगामात किड - रोग व्यवस्थापनाबाबतचा विद्यापीठाचा सल्ला शेतक-यांपर्यंत
पोहचविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्याचा सल्ला दिला.
लातुरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रमेश भताणे यांनी क्रॉपसॅप प्रकल्पाचे बदलेल्या स्वरुपाबाबत मार्गदर्शन करून सांगितले की, कृषि विभागातील सर्व कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांची कीड रोग सर्वेक्षणात असलेली भुमिका निश्चित केलेली
असुन हे काम जबाबदारीने करावे. कीड – रोगाचा उद्रेकच होऊ नये म्हणुन आपली
भुमिका महत्वाची आहे.
प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी कीड सर्वेक्षणाचे महत्व विषद केले. प्रशिक्षणात गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनाबाबत डॉ. पी. आर. झंवर यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. बस्वराज भेदे यांनी सोयाबीन वरील किड व्यवस्थापन, डॉ. अनंत बडगुजर यांनी किडींचे सर्वेक्षण पध्दती, डॉ एस डी बंटेवाड यांनी तुर कीडीचे व्यवस्थापन तसेच रोग
व्यवस्थापनावर डॉ घंटे यांनी मागर्दशन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. सदरील प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील जवळपास 200 पेक्षा जास्त कृषि अधिकारी उपस्थित होते.
Tuesday, June 19, 2018
Friday, June 15, 2018
विद्यापीठाच्या ब्लॉगला उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार
ब्लॉगचे तीन लाख वेळेस वाचन केवळ
एकोणसत्तर (69) महिण्यात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्यानी सप्टेबर २०१२ मध्ये promkvparbhani.blogspot.com हा ब्लॉग सुरू करून एकोणसत्तर (69) महिने पुर्ण झाले असुन हा ब्लॉग तीन लाख वेळेस वाचण्यात आला आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे, या वाचकात इतर देशांतील वाचकांचाही समावेश आहे. पहिल्या चाळीस महिण्यात एक लाख वेळेस वाचन झाले, परंतु पुढील केवळ 29 महिण्यात दोन लाख वेळेस वाचन झाले. म्हणजेचे दर महिण्यास साधारणत: सात ते आठ हजार वेळेस वाचन होते.
या एकोणसत्तर (69) महिन्यात विद्यापीठाच्या साधारणत: एक हजार बातम्या, पोस्ट व घडामोडींची माहिती छायाचित्रासह ब्लॉगवर प्रसिध्द करण्यात आल्या यास वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेषत: या विविध बातम्यास प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी आपआपल्या दैनिकात, साप्ताहिकात तसेच मासिकात मोठी प्रसिध्दी दिली. सदरिल प्रसिध्द केलेल्या पोस्ट या विद्यापीठातील विविध घडामोडी, कृषि तंत्रज्ञान, कृषि सल्ला, कृषि हवामान अंदाज, कृषि संशोधन, विद्यापीठाच्या उपलब्धी आदींशी संबंधीत आहेत. शेतकरी बांधव, विद्यार्थ्यी व सामान्य नागरीक ही ब्लॉगचा वाचक असुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान त्वरित शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यास ही मदत होत आहे. ब्लॉग अविरत कार्यरत राहण्यास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, विस्तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक व संशोधन संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच विद्यापीठातील विविध महाविद्यालये, संशोधन केंद्रे व विविध कार्यालये येथील अधिकारी, कर्मचारी, शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांचेही मोठे योगदान आहे.
गेल्या एकोणसत्तर
(69) महिन्यातील विद्यापीठाच्या विविध
घडामोडीचे ब्लॉग हे साक्ष असुन आजही कोणतीही मागील घडामोडी व बातम्या छायाचित्रासह
आपण पाहु शकतो, हे सर्व आपल्या सर्वांच्या
सहकार्यामुळेच शक्य होऊ शकले. विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्याने
सर्वांचे शतश: आभार, या पुढेही आपला असाच प्रतिसाद व सहकार्य लाभो, हीच अपेक्षा.
धन्यवाद
आपला स्नेहांकित,
जनसंपर्क अधिकारी,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
परभणी
परभणी
Thursday, June 14, 2018
Wednesday, June 13, 2018
सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळीच विशेष काळजी घेण्याचे वनामकृविचे आवाहन
मराठवाडयातील सोयाबीन हे खरीप हंगामातील
प्रमुख पीक असुन यावर्षी सोयाबीनचा पेरा
वाढण्याची शकता आहे. गेल्या वर्षीच्या सोयाबीनवरील विविध किंडीच्या प्रादुर्भावाची
परिस्थिती पाहिल्यास चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे ब-याच ठिकाणी शेतक-यांचे नुकसान झाले. त्यामुळे या किडींच्या व्यवस्थापनासाठी यावर्षी
हंगामाच्या सुरुवातीपासून आणि पेरणीच्या वेळी विशेष लक्ष देण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने केले आहे.
सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाची उगवण झाल्यावर लगेच सुरुवात होते. यावेळेस प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. अंडयातून अळी निघाल्यानंतर बीजदल पोखरते व नंतर मुख्य खोडामध्ये शिरते. त्यामुळे अशी रोपे कोमेजातात व वाळून जातात. पीक मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही.
चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत आढळतो. अळी पानाचे देठ, खोड पोखरुन आत शिरते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त भाग सुकुन जातो. खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. तसेच या किडी खोडामध्ये राहत असल्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करणे अवघड जाते. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून त्यांचे विविध पध्दतीवदारे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
• हंगाम संपल्यानंतर शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावे. त्यामुळे त्यात असणा-या सुप्तावस्था नष्ट होतील.
• उन्हाळी नांगरट केल्यास किडीच्या
सुप्तावस्था कडक उन्हामुळे किंवा पक्षी खाल्यामुळे नष्ट होतील.
• पेरणी जुलैच्या दुस-या
आठवडयापर्यत संपवावी.
• पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत
पीक तणमुक्त ठेवावे.
• प्रादुर्भावग्रस्त पाने, फांदया आतील किडीसह नष्ट
कराव्यात.
• पेरतेवेळी जमिनीमध्ये फोरेट 10 टक्के सीजी 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणे
जमिनीत मिसळावे.
• कीडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ट्रायझोफॉस 40 ईसी 12 मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली यांची फवारणी करावी.
Subscribe to:
Posts (Atom)











