औरंगाबादः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या
सभागृहात महाराष्ट्रासह गुजरात व गोवा राज्यांतील कृषी विज्ञान केंद्रात बसविल्या
जाणा-या स्वयंचलित हवामान केंद्राच्या नोडल अधिका-यांचा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
दिनांक 6 व 7 जुलै रोजी संपन्न झाली. कार्यशाळेत अटारी पुणेचे संचालक डॉ लखनसिंग,
भारतीय हवामान विभाग, पुणेचे प्रमुख डॉ आर ए चटोपध्याय, डॉ के घोष, डॉ आर बाला
सुब्रमण्यम, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, ग्रामीण कृषी
मौसम सेवेचे डॉ कैलास डाखोरे आदींनी मार्गदर्शन केले. ग्रामीण कृषी संदेश
प्रणालीच्या माध्यमातुन अचुक संदेश येत्या काळात शेतक-यांपर्यंत पोचविण्याचा
निश्चिय करण्यात आला. प्रशिक्षणात विभाग स्तरावरून होत असलेली प्रचलित कृषी
हवामान संदेश प्रणाली सेवा व त्यासंबंधी नोंदी, कृषी हवामान संदेशाव्दारे हवामान
अंदाज, दैनिक हवामान माहिती, हवामान अंदाज, पिकांची अवस्था, स्थिती व विविध पीक
निगडीत माहितीच्या आधारे कृषी हवामान संदेश तयार करणे, कृषी हवामान संदेश
प्रसारण, भारतीय हवामान विभाग व संबंधित संकेतस्थळ हाताळणी आदी विषयी नोडल
अधिका-यांना माहिती देण्यात आली. गुजरात मधील नऊ, गोव्यातील दोन तर महाराष्ट्रातील
दहा असे एकुण 21 नोडल अधिका-यांचे प्रशिक्षणात सहभाग होता. मराठवाडयातुन निवड झालेल्या
औरंगाबाद व उस्मानाबाद कृषि विज्ञान केंद्राचे नोडल अधिकारी यामध्ये सहभागी झाले
होते. सुत्रसंचालन डॉ अनिता जिंतुरकर यांनी केले तर आभार डॉ किशोर झाडे यांनी
मानले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम
समन्वयक प्रा दिप्ती पाटगांवकर, प्रा गीता यादव, डॉ दर्शना भुजबळ, हनुमंत
देवठाणकर, मंगला कडाळे, किशोर शेरे, कैलास सुदेवाड, लक्ष्मण शिंदे, जयदेव सिंगल,
जमीर शेख आदींनी परिश्रम घेतले.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Saturday, July 7, 2018
Friday, July 6, 2018
लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालायांत जैवमाहिती तंत्रज्ञानावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
लातुर: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान
महाविद्यालायांतर्गत दिनांक ४ व ५ जुलै जैवमाहीती तंत्रज्ञानावर आधारित दोन दिवसीय
कार्यशाळा पार पडली. नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग
पुरस्कृत योजने अंतर्गत ह्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग,
कृषी महाविद्यालय व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातुर येथील पदव्युत्तर
विद्यार्थ्यासाठी जैवमाहीती तंत्रज्ञानासंबधी कौशल्यविकास करिता करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रा. हेमंत पाटील यांनी विद्यार्थांना या नवीनतम कृषि जैव-माहिती विज्ञान
क्षेत्रामध्ये विद्यार्थांनी करीअर म्हणून पहिले पाहण्याचा सल्ला दिला तर लातुर कृषी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण कदम यांनी या जैवमाहिती तंत्राचा वापर होऊन भविष्यात
शेतकऱ्यांच्या पिकांची गुंणवत्ता व उत्पादकता वृद्धींगत होऊ शकेल, असा मत व्यक्त
केला.
सदर प्रशिक्षणांतर्गत जैवमाहिती तंत्रज्ञान संबधी विविध साधने व तंत्र
याबाबत अरेजेन टेकनॉलोजी कंपनीतील तज्ञ राजेश कुमार महतो यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात
कार्यशाळेचे आयोजक डॉ. अमोल देठे यांनी जनुक शोध, संगणक पॅटर्न ओळख, डेटा खाण, मशीन शिक्षण, अल्गोरिदम विकास आणि जीनोमिक्स
संबंधित प्रणालीचे महत्व विषद केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी डॉ. राहुल चव्हाण, प्रा.
मकरंद भोगावकर आदींनी सहकार्य केले.
जैवमाहिती तंत्रज्ञान (बायोइन्फॉर्मेटिक्स) हि उदयोन्मुख माहिती
तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान यांचा संयोग असलेली जीवशास्त्राचीच एक शाखा आहे. याद्वारे, वनस्पती वा इतर सजीवांच्या जनुकांमध्ये कोणतेही बदल टिपण्यासाठी, रोगप्रतिकारक
व जबाबदार जनुकीय गट शोधण्यासाठी, नवनवीन
औषधाच्या निर्मितीत मदत करण्यासाठी हे अत्यंत अचूकपणे तसेच अल्पकालावधीत सध्या
केले जाऊ शकते हे विशेष. याचेच उदाहरण म्हणजे मानवीय जनुकीय नकाशाची निर्मिती,
अश्याच प्रकारे अनेक पिके व शेतीउपयोगी जिवानुंचा देखील जनुकीय संरचनेचा अभ्यास व
त्यावरील संशोधन आता अधिक सक्षमपणे करणे, शक्य झाले आहे. यातून मोठ्या प्रमाणात
दडलेली जैवकिय माहिती व तिचा योग्य वापर एकूणच मानवकल्यानाकरिता होणे अपेक्षित
आहे.
Thursday, July 5, 2018
मौजे कुंभकर्ण टाकळी (ता.जि. परभणी) येथे वृक्ष लागवड कार्यक्रम
कृषि दिनाच्या पार्श्वभुमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातर्गत असलेल्या परभणी कृषि महावि़द्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम व
राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05 जुलै रोजी वृक्ष
लागवडीचा कार्यक्रम मौजे कुंभकर्ण टाकळी (ता. जि. परभणी) येथे
राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले होते
तर डॉ. सी. बी. लटपटे, श्री. पानझाडे, सौ. कुलकर्णी, सरपंच
प्रभुभैय्या जयस्वाल, सदाशिव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी
प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले मार्गदर्शनांत म्हणाले की, हवामान बदलाचा शेतीवर
परिणाम होत असुन हा परिणाम कमी करण्यासाठी प्रत्येकांनी वृक्ष लागवड व त्याचे
सवंर्धन केले पाहिजे. डॉ. सी. बी. लटपटे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन कौस्तुभ दिक्षीत यांनी केले तर आभार छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट डॉ.
आशिष बागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे
कुषीदुत व राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक यांनी परीश्रम घेतले.
Wednesday, July 4, 2018
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे जांब येथे वृक्ष लागवड व वृक्षदिंडीचे आयोजन
कृषी दिनाच्या पार्श्वभुमीवर वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी
कार्यानुभव कार्यक्रमांच्या कृषीकन्यांनी मौजे जांब (ता.जि. परभणी) येथे दिनांक 3 जुलै रोजी वृक्ष लागवड व
वृक्षदींडीचे आयोजन केले होते. कार्यक्रमास सरपंच संजय स्वामी, उपसरपंच अजय
रेंगे, मुख्याध्यापक श्री वैद्य, श्री कुरेवार, प्रगतशील शेतकरी भगवानराव रेंगे,
डॉ पपिता गौरखेडे, डॉ स्वाती झाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषीकन्यांनी
गावातुन वृक्षदींडी काढली तसेच शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात
आली. शेतक-यांना मोगरा, अशोका, लिंबोनी, चिंच, आवळा आदीं विविध रोपांचे वाटप करण्यात
आले. स्वच्छता अभियान घेण्यात येऊन प्लॉस्टिक मुक्तीचा संकल्प करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांसाठी शेतीविषयावर निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले, उत्कृष्ट
निबंधास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. प्रगतशील शेतकरी
भगवानराव रेंगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गौरखेडे
यांनी तर सुत्रसंचालन कृषीकन्या तेजस्वीनी भद्रे हिने केले. यावेळी मनेष यादव,
बाकळे मॅडम, सुतार मॅडम आदीसह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
डॉ पपिता गौरखेडे व डॉ स्वाती झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्यांनी
पुढाकार घेतला.
Tuesday, July 3, 2018
वनामकृवित शेळीपालन व रोपवाटीका व्यवस्थापन यावर कौशल्य विकास निवासी प्रशिक्षण संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील कृषि
तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय आणि
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), हिंगोली यांच्या
संयुक्त विदयमाने ग्रामीण युवक व शेतकरी यांचे करिता शेती आधारीत / शेतीपुरक उत्पादन
/ प्रक्रिया व्यवसाय कौशल्य आधारीत प्रशिक्षण योजनेंतर्गत हिंगोली जिल्हयातील युवकांसाठी
‘शेळीपालन आणि ‘रोपवाटीका व्यवस्थापन’ या विषयांवर प्रत्येकी सहा दिवसाचे निवासी प्रशिक्षण दिनांक २५ ते ३०
जून दरम्यान आयोजित करण्यात आले होते, यात ३० शेतक-यांनी सहभाग नोंदविला. शेतक-यांना
प्रत्यक्ष प्रात्याक्षिकातून कौशल्यवृध्दी व्हावी म्हणून अभ्यासक्रमात ७०
टक्के प्रात्याक्षिकावर भर देण्यात आला होता.
समारोपीय कार्यक्रम विस्तार शिक्षण संचालक डॉ.
प्रदीप इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला, यावेळी विभाग प्रमुख डॉ. जी. एम.
वाघमारे,
डॉ. बी. एम. ठोंबरे, मुख्य विस्तार शिक्षण
अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, नाबार्डचे श्री. पी. एम. जंगम आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
मार्गदर्शनात डॉ. प्रदीप इंगोले यांनी प्रशिक्षणातील
माहिती व तंत्र प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा सल्ला प्रशिक्षणार्थींना देऊन शेतकरी
समुह स्थापनाचे आवाहन केले. प्रशिक्षणार्थीं सोपान शिंदे आणि श्रीधर राऊत यांनी
प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करुन कौशल्य प्रत्यक्षात अमलात आणण्याचे आश्वासन
दिले. मान्यवरांचे हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक विस्तार कृषि विदयावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले तर
सुत्रसंचालन डॉ एस जी पुरी यांनी मानले.
प्रशिक्षणात शेळीपालन याबाबतील विविध विषयांवर
विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. एस. जी. नरवाडे, डॉ. दिनेश चौहाण, डॉ. अे. टी. शिंदे, डॉ. डी. व्ही. बैनवाड यांनी मार्गदर्शन केले तर रोपवाटीका व्यवस्थापनातील
विविध बाबींवर विभाग प्रमुख डॉ. जी. एम. वाघमारे, डॉ. आर. एस. बोराडे, डॉ. एम. एस. दडके,
डॉ. विनोद शिंदे, डॉ. आर. एस. बरकुले, डॉ. बी. एस. कलालबंडी, प्रा. डी. डी. पटाईत, प्रा. अंशुल लोहकरे, प्रा. एस. पी.चव्हाण, श्री. एम. वाय. साळवे आदींनी आदींनी प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शन
केले. नाबार्डचे श्री. पी. एम. जंगम व प्रकल्प अधिकारी रुपाली कानगुडे यांनी जिल्हा
उदयोग केंद्राचे विविध उपक्रमाबाबत तर डॉ. एस. जी. पुरी यांनी उद्योजकता विकास व
संभाषण कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे आयोजन विस्तार शिक्षण संचालक डॉ.
प्रदीप इंगोले यांच्या निर्देशानुसार व विस्तार
कृषि विदयावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण समन्वयक डॉ.
एस. जी. पुरी यांनी यशस्वीपणे केले.
Monday, July 2, 2018
प्लॉस्टिक पिशव्यास पर्यायी उपयुक्त कापडी पिशव्याची निर्मिती व प्रसार
वनामकृवितील सामाजिक विज्ञान
महाविद्यालयाचा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठांतर्गत असलेल्या सामाजिक विज्ञान महाविद्यालयतील वस्त्र व परिधान
अभिकल्पना विभागातील विद्यार्थींनी प्लॉस्टिक बंदीच्या पार्श्वभुमीवर पर्यावरणपुरक
विविध आकारातील आकर्षक व उपयुक्त कापडी पिशव्या निर्मिती करण्यास सुरवात केली आहे.
कृषी दिननिमित्त दिनांक 1 जुलै रोजी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते या
कापडी पिशव्याचे विमोचन करण्यात आले. यावेळी
विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील,
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव
डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलवडे, डॉ.
एन. जी. लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. विभाग प्रमुख प्रा मेधा उमरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमाचा भाग म्हणुन विद्यार्थींनी या पिशव्याची निर्मिती करीत असुन विभागात अल्प दरात उपलब्ध आहेत.
वनामकृवित गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस पोर्टल बाबत प्रशिक्षण संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठाच्या नियंत्रक कार्यालयाच्या वतीने दिनांक 2 जुलै रोजी शासकीय कार्यालयासाठी खरेदीबाबत शासनाने
लागू केलेल्या नवीन ऑन लाईन पद्धतीने खरेदी करण्यासाठी गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस
Gem पोर्टल बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे
उदघाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्या हस्ते झाले तर विस्तार शिक्षण
संचालक डॉ प्रदीप इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल पोर्टल वर खरेदी
करण्याबाबतचे प्रशिक्षण श्री माणिक शिनगारे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
नियंत्रक विनोद गायकवाड यांनी केली. या प्रशिक्षणात विद्यापीठातील सर्व आहरण व
सवितरण अधिकारी - कर्मचारी मोठया संख्येन उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)






