मार्गदर्शनात डॉ. के. आर. कांबळे यांनी ज्वारी पिकाचे मानवी आहारातील महत्व व दुध व्यवसायात जनावरांकरिता कडब्याचे महत्व सांगितले. डॉ. एल. एन. जावळे यांनी विद्यापीठ विकसित ज्वारीचे वाण परभणी शक्ती व सीएसएच ४१ बाबत माहिती देऊन ज्वारी लागवड तंञज्ञानाबाबत मार्गदर्शन केले तर डॉ. मोहम्मद ईलियास यांनी खोडमाशी, खोडकिड, अमेरिकन लष्करी अळी, हुमनी, मावा आदी किडीच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करून बीजप्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच डॉ. प्रितम भुतडा यांनी आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक योजने बद्दल माहिती देऊन जिओ टॅगिग करण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले. सदरिल कार्यक्रम संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला. कार्यक्रमास जांब, सनपुरी, रायपुर आदी गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Saturday, June 18, 2022
वनामकृवि विकसित ज्वार वाणाच्या बियाण्याचे आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत वाटप
Friday, June 17, 2022
मौजे कोल्हावाडी येथे घटसर्प व फ-र्या रोग प्रतिबंध पशु लसीकरण कार्यक्रम संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय, रेशीम संशोधन केंद्र आणि जिल्हा पशुवैद्यकिय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दिनांक १५ जुन रोजी मौजे कोल्हावाडी (ता. मानवत) येथे घटसर्प व फ-र्या रोग प्रतिबंध पशू लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच श्री विठ्ठल भिसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल उपस्थित होते. पशू परजिवीशास्त्र विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब नरळदकर, पशुधन विकास अधिकारी डॉ मोहम्मद माजीद, डॉ दिपाली कांबळे, डॉ पी आर पाटील, रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ चंद्रकांत लटपटे, डॉ रमेश पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत लाड, मुंजाजी भिसे, गोंविद भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पशु लसीकरणाचे महत्व यावर प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल यांनी मार्गदर्शन केले. तसेच रेशीम उद्योगाबाबत आयोजक डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. डॉ बालासाहेब नरळदकर यांनी 5 टक्के निंबोळीचा अर्क वापरुन गोचीड निर्मुलना बाबत मार्गदर्शन केले.
लसीकरण कार्यक्रमांतर्गत गावातील पशुंचे मोफत लसीकरण
करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत लाड यांनी केले. सुत्रसंचलन
कृषिकन्या राजनंदिनी कदम तर आभार के. डी. खैरे यांनी मानले. प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल
आणि रावे समन्वयक डॉ राजेश कदम यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण जागरूकता कार्यानुभव
कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रावेच्या कृषिकन्या काळे,
जाधव, कुलकर्णी, इंगळे, जैस्वानी, क-हाळे, लगड, कणखर आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास
गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षणासाठी व्यक्तीची मानसिकता बदलणे आवश्यक ……. इंजि. शंकर आजेगावकर
वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माझी वसुंधरा अभियान संपन्न
प्रत्येक देशाच्या भवितव्यासाठी पाणी, ऊर्जा, स्वास्थ्य, कृषी, जैवविविधता आदीबाबत प्रत्येक नागरिकांनी सजग
राहणे नितांत गरजेचे असुन पर्यावरणाचे संरक्षण होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या
वर्तनात उचित बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलमित्र इंजि. शंकर आजेगावकर
यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले, या अभियानाच्या समारोपाप्रसंगी दिनांक १३ जुन रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ जया बंगाळे या होत्या तर कार्यक्रमास जलमित्र प्रतिष्ठान परभणीचे संस्थापक डॉ. राजगोपाल कालानी, जलमित्र डॉ. रवींद्र मुळे, श्री. रुस्तुम कदम, श्री. उमेश पाचलींग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात जलमित्र डॉ. राजगोपाल कालानी, जलमित्र डॉ. रवींद्र मुळे, श्री. रुस्तुम कदम, श्री. उमेश पाचलींग याच्या पर्यावरण संरक्षणासाठी असलेल्या बहुमोल योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ विद्यानंद मनवर यांनी केले, आभार डॉ निता गायकवाड यांनी मानले. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, झाडांना आच्छादन, पालापाचोळयापासून गांडूळ खत निर्मिती, पर्यावरण संरक्षणाबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन, जनजागृती प्रभात फेरी, ‘आम्ही पर्यावरण रक्षक’ पथनाट्य आदीं विविध उपक्रम महाविद्यालयाच्या रासेयोच्या कार्यक्रम अधिकारी डॉ विद्यानंद मनवर यांच्यासह स्वयंसेवकांनी विविध राबविले. कार्यक्रमास डॉ. शंकर पुरी, डॉ. सुनिता काळे, डॉ. तस्नीम नाहिद खान, डॉ. माधुरी कुलकर्णी आदीसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
Thursday, June 16, 2022
वनाममकृवितील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास अतिशय कार्यतत्पर केंद्राचा विशेष पुरस्कार प्रदान
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील अतिशय कार्यतत्पर संशोधन केंद्र हा विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले. हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्थेत २ ते ४ जून दरम्यान अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या विविध केंद्राची व्दिवार्षिक कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. सदरिल कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. मदन पेंडके, प्रा. रावसाहेब राऊत, डॉ. पपीता गौरखेडे आदींनी स्विकारला.
कार्यशाळेत देशभरातील एकूण ३२ कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी हैद्राबाद येथील प्रोफेसर जयशंकर तेलंगणा राज्य कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रविणराव, केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्थेचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग, मोदीपुरम येथील एकात्मिक शेती पध्दती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. एस. पनवार भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे डॉ. सी. आर. मेहता, नागपुर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, प्रकल्प समन्वयक डॉ. जी. रविंद्र चारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदरिल संशोधन केंद्राच्या वतीने कोरडवाहू आधारीत शेतातील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी विविध संशोधन प्रयोग घेण्यात येवून शेतकरी बंधूंना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच या संशोधन केंद्रामार्फत मागील १० वर्षापासून हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहे. मागील तीन वर्षापासून कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती ही योजना देखील राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर आधारीत पिकांच्या उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येते. या कार्याची दखल घेऊन सदरिल पुरस्काराकरिता केंद्राची निवड करण्यात आली. पुरस्काराबद्दल संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम आदींनी प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले.
उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि़द्यापीठातील उद्यानविद्या महावि़ालयाच्या
राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने माझी
वसुंधरा अभियाना अंतर्गत परभणी जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या प्रसंगी जिल्ह्राच्या जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल, निवासी
उपजिल्हाधिकारी श्री महेश वडदकर, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे,
तहसिलदार श्री संजय बिराजदार, नायब तहसिलदार श्री शेख आदींनी कार्यक्रमास शुभेच्छा
देऊन स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी स्वच्छता रॅली काढुन जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालय परिसर
स्वच्छ केला. सदर अभियान प्राचार्य
डॉ जी एम वाघमारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ सचिन मोरे, कार्यक्रम
अधिकारी डॉ. एस आर बरकुले यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोच्या स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी
राबविला. कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ.
जि पी जगताप, डॉ. बी एम
कलालबंडी, डॉ. व्हि.
व्हि. भगत, डॉ. अे.
एस. लोहकरे, डॉ. एस आर
वानखेडे, डॉ. पी एस
देशमुख, डॉ. एस बी
पव्हणे, डॉ. एस एस
बांगर, डॉ. एस वाय
ढाले, श्री एस डी
पुंड, श्री व्हि
जी कांबळे, श्री एस के
वाघ आदींनी सहभाग नोंदवला.
वनामकृवित हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत खरीप पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या वतीने हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम अंतर्गत संशोधनात्मक पीक प्रात्यक्षिक योजने करिता मौजे उजळांबा, बाभुळगाव व सोन्ना ही गावे दत्तक गावे म्हणु निवड करण्यात आली असुन दत्तक गावातील शेतकरी बांधवा करिता दिनांक ११ जुन रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, सरपंच सरपंच श्री. गणेश दळवे, श्री. ज्ञानोबा पारधे, कृषि अभियंता डॉ. एम. एस. पेंडके, डॉ. पी. एच. गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात खरीप पिक व्यवस्थापनाबाबत डॉ. वासुदेव नारखेडे यांनी मार्गदर्शन करून विद्यापीठ विकसित विविध पिकाच्या वाणाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात सोयाबीनच्या एमएयुएस १५८, तुरीच्या बीडीएन ७११, मुग बीएम २००३-०२, खरीप ज्वारी पीव्हीके १००९ या सुधारीत वाणाची बियाणे शेतकऱ्यांना संशोधन प्रात्यक्षिकासाठी देण्यात आले. हवामान बदलानुरुप परिस्थितीत या पिकांच्या वाणांचा अभ्यास शेतकऱ्यांच्या शेतावर करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रसंगी “हवामान बदलानुरुप परिस्थितीत कोरडवाहू शेतीचे व्यवस्थापन” ही पुस्तिका शेतकरी बंधुंना वाटप करण्यात आली. तसेच कृषि ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील विद्यार्थींनी सोयाबीन बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासंबंधीचे प्रात्यक्षीक करून दाखविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती गुंजकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बालासाहेब घोलप, विनायक रिठे, मोरेश्वर राठोड, दिपक भुमरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मौजे बाभुळगाव, उजळांबा व सोन्ना येथील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
Wednesday, June 15, 2022
वनामकृवितील कृषी अभियांत्रिकी व अन्नतंत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेल्वेस्थानक परिसरात राबविली स्वच्छता मोहिम
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात आले. यात दिनांक १३ जुन रोजी राष्ट्रीय योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ प्रवेशव्दार परिसरात जलसिंचन, वृक्षारोपण व व्यसनमुक्ती संदर्भातील पथनाट्ये सादर केली. शहरातील रेल्वे स्थानक परिसरात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिम राबवुन प्लास्टिक सारख्या अविघटनशील व विघटनशील कचरा जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. त्याच प्रमाणे रेल्वेस्थानकाच्या समोरील भागात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, कार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रवीण घाटगे, डॉ. भारत आगरकर, रेल्वे स्थानक अधिक्षक अरविंद इंगोले, पोलीस निरीक्षक विकास झा आदींनी मार्गदर्शन केले. सदरिल “माझी वसुंधरा अभियान” उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या सुचनेनुसार राबविण्यात आला. स्वयंसेवक अजिंक्य कदम, धनराज केंद्रे, खुशबू कुमारी, नेहा जाधव, जानव्ही चव्हाण, सौरभ काळे, विश्वजित तिकटे, गायत्री वाणी, दिपाली अवचार, प्राची गोटामी, आरती महाजन, अवंतिका पारवे, क्षितिजा मस्के आदीनी परिश्रम घेतले.






.jpeg)








.jpg)