Friday, July 1, 2022

हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

वनामकृवित स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली. विद्यापीठातील स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या स्‍मारकाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. कार्यक्रमास माननीय कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी मा श्रीमती ज्‍योतीताई येवले, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, प्राचार्या डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने  उपस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठ परिसरात विविध महाविद्यालय आणि विभागात कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले आणि त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी श्रीमती ज्‍योतीताई येवले यांच्‍या हस्‍ते वृक्षलागवड करण्‍यात आली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक आणि राष्‍ट्रीय छात्रसेनेच छात्रसैनिक यांनी परिश्रम घेतले.

मौजे पारवा येथे वृक्षारोपण आणि पशुंचे लसीकरण मोहिम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालय, करडई संशोधन केंद्र व जिल्हा पशुवैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिनांक १ जुलै रोजी माजी मुख्‍यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्‍त कृषि दिनी मौजे पारवा येथे वृक्षारोपण आणि घटसर्प व फऱ्या रोग प्रतिबंध पशु लसीकरण मोहिम राबविण्‍यात आली. कार्यक्रमास सरपंच श्री मुंजाजी तरडे, पशुधन विकास अधिकारी डॉ सोळंकी, रावेचे कार्यक्रम अधिकारी डॉ डि जी दळवी, प्रमुख पाहुणे श्री सुरेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात डॉ डि जी दळवी यांनी शेती विषयी व पशुसंवर्धनाबद्दल मार्गदर्शन केले तर डॉ. सोळंकी यांनी पशुंच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा आंधळे व आभार विजया आठवले यांनी मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषीकन्या आयुषी आचार्य, देवकी नायर, खुशबू भाटिया, सीसीलिया, मनीषा कुमारी, मोनिका गोप, रिंकी लांबा, शेल बाला, सृष्टी गुप्ता, श्रुतीचंद्रन, स्वागता लक्ष्मीदास, स्वाती पटेल आदींनी परिश्रम घेतले. सदर रावे कार्यक्रम प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्वयक डॉ. राजेश कदम, करडई संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस बी घुगे, सहसम्न्वयक डॉ प्रविण कापसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. डि जी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला.

Thursday, June 30, 2022

मौजे जांब येथे पशुरोग प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत १९० पशुचे लसीकरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या परभणी कृषि महाविद्यालयतील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत करडई संशोधन केंद्र येथील कार्यरत असलेल्‍या कृषीकन्‍यानी दिनांक २८ जुन रोजी मौजे जांब येथे पशुंना घटसर्प व फऱ्या रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवुन १९० पशूंना लसीकरण करण्यात आले.

मोहिमेत पशुधन विकास अधिकारी डॉ. आडे आणि डॉ. यु. आर. लकरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास सरपंच रामभाऊ रेंगे, माजी सरपंच अजयराव जामकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. आडे आणि डॉ. लकरे, ग्रामसेवक पंजाबराव देशमुख, बाळासाहेब रेंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात डॉ. आडे आणि डॉ. लकरे यांनी पशु लसीकरणाचे महत्‍व सांगितले, त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली गावातील १९० पशुंचे लसीकरण करण्‍यात आले. याप्रसंगी पशुपालकांना भिंतीफलकांवर व तक्ताद्वारे जनावरांच्या रोगांविषयी माहिती देण्यात आली.

सदरिल कार्यक्रम शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्वयक डॉ. आर. पी. कदम, करडई संशोधन केंद्राचे डॉ. एस. बी. घुगे, रावे सहसमन्वयक डॉ . पी. एस. कापसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. डब्ल्यू. मोरे आदींच्‍या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए. डब्ल्यू. मोरे यांनी केल. सूत्रसंचालन प्राजक्ता गवळी हिने केले तर आभार श्रुती देशमुख हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषीकन्या वैष्णवी देशमुख, गायत्री धानोरकर, प्रीती गरड, मेघा गिरी, अंजू हेंद्रे, रेणुका गादेवार, वेदिका धुतराज, मनस्वी भोयर, स्नेहल चव्हाण, प्रियंका ढगे, अखिला, पूजा चंदा, अमृता देशमुख, प्रणिता भोसले, प्रियंका चौरे, ऐश्वर्या आंबेकर आदींनी परिश्रम घेतले.

Wednesday, June 29, 2022

खामगांव (बीड) येथील कृषि विज्ञान केंद्रात कृषि संजीवनी मोहीम अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या खामगांव (बीड) येथील कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग व आत्मा, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने "कृषि संजीवनी मोहीम" अंतर्गत कृषि विज्ञान केंद्रात दिनांक २९ जून रोजी "शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आत्मा संचालक श्री. दशरथ तांबाळे हे उपस्थित होते तर बीड जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. बाबासाहेब जेजुरकर, बीड आत्मा प्रकल्प संचालक श्री. दत्तात्रय मुळे, बीड, माजलगाव उपविभागीय कृषि अधिकारी श्री. सुरज मडके, कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटगावकर, गेवराई तालुका कृषि अधिकारी श्री. अभय वडकुते, व बीड तालुक्यातील उमेद चे तालुका समन्वयक, आष्टी येथील धान फाउंडेशनचे तालुका समन्वयक, आर्थिक विकास महामंडळ, गेवराईचे तालुका समन्वयक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात श्री. दशरथ तांबाळे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकांची लागवड करताना बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, जलसंवर्धना करीता बीबीएफ तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, कापणी पश्चात तंत्रज्ञान तसेच स्मार्ट प्रकल्पाचे विविध योजना, धान्य तारण योजना ई. बाबत मार्गदर्शन केले. श्री. दत्तात्रय मुळे यांनी आत्मा अंतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मूल्यवर्धनामुळे शेतामाल मिळणारे मूल्य, सोबतच आत्मा अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या पोषण बाग किटच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

तांत्रिक सत्रात खरीप पीक लागवड तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञ डॉ. हनुमान गरुड यांनी मार्गदर्शन केले तर हुमणी अळीचे व्यवस्थापनावर डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, शास्त्रोक्त शेळीपालनावर प्रा. किशोर जगताप, बीबीएफ तंत्रज्ञान व दालमिल यावर डॉ. तुकेश सुरपाम यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते केंद्राच्या प्रक्षेत्रावर उभारण्यात आलेल्या "आदर्श पोषण बागेचे" उद्घाटन करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले. केव्‍हीके प्रकाशित पोषण बागेच्या माहिती पत्रकाचे विमोचन करण्‍यात आले तसेच आत्मा, बीड तर्फे पोषण बागेच्या किटचे उपस्थित महिला वर्गास वाटप करण्यात आले.

प्रास्‍ताविकात प्रा. दिप्ती पाटगावकर यांनी पोषण बागेत प्रात्यक्षिक देऊन बाग तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि पर्यवेक्षक श्री. घसिंग यांनी केले तर आभार तालुका कृषि अधिकारी श्री. अभय वडकुते यांनी केले. कार्यक्रमात १५० पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव, शेतकरी महिला सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, खामगाव, कृषि विभाग व आत्मा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच कु. अश्विनी म्हस्के, मंडळ कृषि अधिकारी, जातेगाव यांनी परिश्रम घेतले.

मौजे कोल्हावाडी येथे कृषिकन्यांनी राबविला बीजप्रक्रिया प्रात्‍यक्षिक कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत मौजे कोल्‍हावाडी येथे दिनांक २७ जुन रोजी कृषिकन्यांनी सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले. बीज प्रक्रिया करण्‍याची शास्‍त्रशुध्‍द पध्‍दती व त्याचे फायदे तसेच पिकांच्या व मातीच्या आरोग्यासाठी जैविक बीजप्रक्रियेचे महत्त्व यावर माहिती दिली. याप्रसंगी बुरशीनाशक - ट्रायकोडर्मा तसेच जीवाणु संवर्धक रायझोबियम यांची बीजप्रक्रिया कृषिकन्या ज्योती लगड व मयुरी इंगळे यांनी सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. कृषिकन्या काळे, कुलकर्णी, कऱ्हाळे, जैस्वानी, खैरे, कदम, कणखर आदींनी सहकार्य केले. सदरिल उपक्रम प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्वयक डॉ. राजेश कदम, रावे केंद्रप्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे, सहसमन्‍वयक डॉ प्रविण कापसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अनंत लाड आदींच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येते आहे. कार्यक्रमास माजी सरपंच श्री.विठ्ठल भिसे यांच्‍यासह गावांतील शेतकरी उपस्थित होते.

Monday, June 27, 2022

मौजे वाडीदमई येथे महिला सक्षमीकरण चर्चासत्र संपन्‍न

महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग, आत्‍मा परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २७ जून रोजी मौजे. वाडीदमई (जिल्हा परभणी) येथे कृषी संजीवनी महोत्सवांतर्गत महिला सक्षमीकरण चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख वक्‍ते म्‍हणुन विस्‍तार कृषी विद्यावेत्‍ता डॉ. गजानन गडदे हे उपस्थित होते तर अध्यक्षस्‍थानी सरपंच श्रीमती लताबाई तरटे या होत्‍या, उपसरपंच श्री विश्वनाथ तरटे, पोलीस पाटील लक्ष्मण बिडकर, प्रगतशील महिला शेतकरी अनुराधाताई, उत्तमराव तरोटे, बाळासाहेब गायकवाड, दत्तराव गायकवाड, प्रकाश तरोटे, मुंजाजी गायकवाड, गवण मोगरे, अनिताताई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ गजानन गडदे म्‍हणाले की, शेतीतील बीज प्रक्रिये पासुन ते काढणी, साठवणुक आदी प्रत्‍येक कामात महिलांचा मोलाचा वाटा असतो, त्‍यामुळे शेतकरी महिलांनी सुधारित तंत्रज्ञान समजुन घ्‍यावे. प्रक्रिया उद्योग, गृह उद्योग आदीच्‍या माध्‍यमातुन कुटुबांला आर्थिक पाठबळ देऊन शकतात, असे सांगुन सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले.

श्रीमती स्वाती घोडके यांनी महिलांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत महिला गटस्थापन करण्‍याविषयी मार्गदर्शन केले तर श्रीमती सुप्रिया धबाले संकटग्रस्त महिला निवारण केंद्र सदस्य वन स्टॉप सेंटर यांनी महिलांना महिला निवारण केंद्र विषयी माहिती दिली.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्‍मा सहाय्यक तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक श्रीमती स्वाती घोडके यांनी केले तर आभार कृषी सहाय्यक श्री. एस. जे. आनेराव कृषी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक श्री. बी. एम. मुंडे, श्रीमती राधा कदम आदी सहकार्य केले.  कार्यक्रमास गावातील महिला शेतकरी, शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Sunday, June 26, 2022

मौजे इंदेवाडी येथे पशुचे लसीकरण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे इंदेवाडी येथे पशुंना घटसर्प आणि फऱ्या रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम दिनांक २५ रोजी राबविण्यात आली. कार्यक्रमास पशुधन विकास अधिकारी डॉ. आडे, डॉ. अमोल कच्छवे, डॉ. रतन कच्छवे, सरपंच संदीप कच्छवे, रतन कच्छवे, संजय सिसोदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात डॉ आडे, डॉ अमोल कच्‍छवे आणि डॉ रतन कच्‍छवे यांनी लसीकरण व जनावरांचे पावसाळात घ्‍यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषीदुतांनी पशुपालकांना भिंतीफलकावर व तक्त्याद्वारे जनावरांच्या रोगांविषयी माहिती दिली. सदरिल कार्यक्रम शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्‍वयक डॉ राजेश कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ एस आर जक्‍कावाड यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रावेच्‍या कृषिदुतांनी परिश्रम घेतले.