माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय
एकता दिवसाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे ‘रन फॉर युनिटी’ अर्थात ‘एकता दौड’ रॅलीचे
दिनांक ३१ ऑक्टोबर
२०२६ रोजी आयोजन करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि परभणीचे व माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत
(भापोसे) यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी राष्ट्रीय
एकता दिवसानिमित्त आयोजित या रॅलीचे विशेष महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, या एकता दौडमध्ये लहान
मुले, ज्येष्ठ नागरिक, विद्यापीठाचे अधिकारी
व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला,
ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमधून समाजात राष्ट्रीय
एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याची भावना अधिक दृढ होते.
पुढे बोलताना त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, सरदार पटेल यांच्या जन्मस्थानी भेट देण्याचे भाग्य मला लाभले. त्या ठिकाणी अनुभवलेले वातावरण आणि जाणवलेली ऊर्जा अत्यंत विलक्षण व प्रेरणादायी होती. खरोखरच या भूमीत एका महान लोहपुरुषाचा जन्म झाला, याची जाणीव तेथे प्रकर्षाने झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांचे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदानही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब
ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी
डॉ. राजेश कदम, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळबांडे यांच्यासह
विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस
प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिरवी झेंडी दाखविल्यानंतर विद्यापीठ परिसरातून एकता दौड
रॅली काढण्यात आली. यावेळी सहभागी नागरिकांनी विविध घोषणांद्वारे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य आणि देशभक्तीचा
संदेश दिला. उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण विद्यापीठ परिसर देशभक्तीच्या वातावरणाने
दुमदुमून गेला.
राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासोबतच सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाचे स्मरण करून देणारा हा उपक्रम उत्साहात पार
पडला.

.png)




.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
