महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत
महाविद्यालय पशुवैद्यक व पशुविज्ञान, परभणी येथे २९ ते ३१
ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या असोसिएशन ऑफ मीट सायंटिस्ट्स अँड
टेक्नॉलॉजिस्ट्स (AMST) यांच्या आठव्या वार्षिक अधिवेशनात व
राष्ट्रीय परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित
संशोधन प्रकल्प - पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण या योजनेचे प्रमुख डॉ. दयानंद टेकाळे
(संशोधन अभियंता) व त्यांच्या सहकाऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या परिषदेत
मौखिक शोधनिबंध सादरीकरणात प्रथम क्रमांक, तर पोस्टर
सादरीकरणात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून त्यांनी दुहेरी यश संपादन केले.
या राष्ट्रीय परिषदेत 'Sustainable and Innovative Food and Meat System: A
One Health Approach for Safety, Nutrition and Resilience for Viksit Bharat' ही संकल्पना केंद्रस्थानी होती. मौखिक सादरीकरणासाठी 'Design and
Development of Grooming Unit for Welfare and Performance of Cattle' या विषयावर सादर केलेल्या संशोधनाला प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच 'Development
of Mechanized Washing Unit for Cattle' या विषयावरील पोस्टर
सादरीकरणाला द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या दोन्ही संशोधन कार्यांमध्ये डॉ. डी. डी. टेकाळे, डॉ. पी. डी. राठोड, डॉ. ए. ए. वाघमारे आणि डॉ. एस. देशमुख यांचा सहभाग होता. या परिषदेत मिळालेल्या यशाबद्दल आयोजकांनी संशोधन कार्याचे कौतुक केले. पशुधनाचे आरोग्य, स्वच्छता, कल्याण आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. या यशामुळे संबंधित संशोधकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन क्षेत्रातील संशोधनाला नवी प्रेरणा मिळाली आहे.




.jpeg)