ब्रताती दास असिस्टंट प्रोफेसर व पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र; मानवी व पद्मश्री पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत
सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या
वतीने घेण्यात आलेल्या यूजीसी-नेट जून २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले
आहे.
सामुदायिक विज्ञान विषयातील एम.एस्सी. अंतिम वर्षातील
विद्यार्थिनी कु. ब्रतती दास यांनी यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण होत असिस्टंट
प्रोफेसर व पीएच.डी. प्रवेशासाठी पात्रता प्राप्त केली आहे. तसेच कु. मानवी झा आणि
कु. पद्मश्री उग्गीना यांनीदेखील यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण करून पीएच.डी.
प्रवेशासाठी पात्रता मिळविली आहे.
या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या अधिष्ठाता
डॉ. नीता गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा
दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी,
कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून
त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
For English
Community Science College Students of VNMKV Excel in UGC-NET Examination
Bratati Das qualifies for Assistant Professor and Ph.D.
admission; Padmashri and Manvi qualify for Ph.D. admission
Students of the
College of Community Science, under Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth
(VNMKV), Parbhani, have achieved remarkable success in the UGC-NET June 2026
examination conducted by the University Grants Commission.
Ms. Bratati Das,
an M.Sc. final-year student in the discipline of Community Science,
successfully cleared the UGC-NET examination and qualified for the post of
Assistant Professor as well as admission to the Ph.D. programme. Similarly, Ms.
Manvi Jha and Ms. Padmashri Uggina also cleared the UGC-NET examination and
qualified for admission to the Ph.D. programme.
.png)