Saturday, August 29, 2026

कृषि अभियांत्रिकीच्या मौखिक सादरीकरणात वनामकृविच्या विद्यार्थ्यांची बाजी

आयईआय–२०२६’ राष्ट्रीय अधिवेशनात सात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन


डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, हवामान बदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्याचा ऱ्हास आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या उद्देशाने आयोजित ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) – ३८वे राष्ट्रीय कृषि अभियंता अधिवेशन व राष्ट्रीय परिसंवाद’ छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे दिनांक २७ व २८ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झाला. या राष्ट्रीय अधिवेशनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार पटकावून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ (Emerging Technologies in Agricultural Engineering for Sustainable and Climate-Resilient Development) ही परिसंवादाची मध्यवर्ती संकल्पना होती. देशभरातून सुमारे ५०० शेतकरी तसेच १०० संशोधक व प्राध्यापक या राष्ट्रीय परिसंवादात सहभागी झाले. विविध विषयांवर सुमारे १०० संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले.

द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या सहकार्याने आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्र आणि एमआयटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘शाश्वत व हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावर विशेष बीजभाषण (State-of-the-Art/Keynote Lecture) दिले.

सात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार

राष्ट्रीय अधिवेशनातील विविध तांत्रिक सत्रांमध्ये संशोधनाचे प्रभावी मौखिक सादरीकरण केल्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार (Best Oral Presentation Award) प्रदान करण्यात आले. यामध्ये पदव्युत्तर विद्यार्थी दिनेश वसंतराव कदम, रीना बी. चौधरी, मंगेश मोहिते आणि सैनी, तर पदवीपूर्व विद्यार्थी स्नेहा शर्मा, पार्वती आणि आभा सिंग यांचा समावेश आहे.

या यशाबरोबरच वनामकृविच्या २५ हून अधिक संशोधकांनी संबंधित लेखक व सहलेखक म्हणून विविध संशोधन निबंधांमध्ये योगदान दिले. तसेच अधिवेशनातील उल्लेखनीय संशोधन व तांत्रिक योगदानाबद्दल विद्यापीठाशी संबंधित १८ संशोधकांचा गौरव करण्यात आला.

वनामकृविच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित अधिवेशनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच संबंधित अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक व मार्गदर्शकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या राष्ट्रीय परिसंवादात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली नाहेप केंद्र प्रमुख फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. गोपाल शिंदे यानी समन्वय व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर सहभाग नोंदविला. यातिल निवडक संशोधन प्रबंधांचे स्प्रिंजर (Springer) मधे प्रकाशित होतील.

मौखिक संशोधन लेख सदरीकरणात कृषि अभियांत्रिकी-महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. राहुल रामटेके. डॉ. सुमंत जाधव, डॉ. व्ही. के. विखे, डॉ. जयभाये , डॉ. पांडित मुंडे, सहायक प्राध्यापक डॉ. दत्तात्रय पाटील, अभियंता विशाल काळबांडे, अभियंता गीता भूमरे, अनिश शहाणे, साक्षम पंडितकर, अभिषेक कदम, रामप्रसाद भांड व गांगुर्डे, तसेच मृदाशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ तथा कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, शास्त्रज्ञ डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी तसेच विस्तार शिक्षण तज्ज्ञ डॉ. प्रवीण कापसे यांचा यांचा सहभाग होता

एमआयटी, छत्रपती-संभाजीनगरचे संचालक प्रा. डॉ. निलेश पाटील, अधिवेशनाचे निमंत्रक तथा प्राचार्य प्रा. (डॉ.) दीपक त्र्यंबक बोरनारे, प्रा. डॉ. नारायण गटकल, प्रा. प्रतीक पोद्दार आणि एमआयटीच्या संपूर्ण चमूने अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले त्या बद्दल सर्व मा कुलगुरु यानी अभिनंदन व आभार व्यक्त केले.