वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व
कौटुंबिक अभ्यास विभागातील प्रायोगिक पूर्वप्राथमिक शाळेत दिनांक १४ ऑगस्ट २०२६
रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
या
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना
रुजविण्यात आली. यावेळी डॉ. वीणा भालेराव यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या
राष्ट्रध्वजाची माहिती देत राष्ट्रध्वजातील रंगांचे महत्त्व आणि त्यामागील
प्रेरणादायी संदेश समजावून सांगितला. तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान
स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या त्याग व बलिदानाची
माहिती देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सोप्या आणि प्रेरणादायी
शब्दांत पटवून दिले.
कार्यक्रमात
विराज बोंडे आणि तेजस घुले या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर करून
उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमात
देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन शिक्षिका श्रुती औंढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
शाळेतील सर्व शिक्षिका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रायोगिक
पूर्वप्राथमिक शाळेतील सर्व शिक्षिका,
मदतनीस आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpeg)
.jpeg)