नैसर्गिक साहित्याच्या आकर्षक सजावटीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब
ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा तीन दिवसीय गणेशोत्सव उत्साहात साजरा
करण्यात आला. दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी पर्यावरणपूरक पद्धतीने श्री
गणेशमूर्तीचे विसर्जन करून गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली.
महाविद्यालयात
दरवर्षी तीन दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य
म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी आकर्षक व अभिनव सजावट होय. वडाच्या
पारंब्या, बांबू, पाने, फुले तसेच विविध नैसर्गिक व पर्यावरणपूरक
साहित्याचा कल्पकतेने वापर करून गणेशमूर्तीसमोरील देखावा साकारण्यात आला. पारंपरिक
कलात्मकता आणि पर्यावरणपूरक संकल्पना यांचा सुंदर मिलाफ या सजावटीतून पाहायला
मिळाला.
या
गणेशोत्सवाच्या विविध दिवसांमध्ये विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब
ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश अहिरे, प्रभारी संचालक संशोधन डॉ. रणजीत चव्हाण,
कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे तसेच मुख्य विस्तार
शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी महाविद्यालयास भेट देऊन श्री गणेशाची
आरती केली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी,
कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या
अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आणि जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी यांच्या
मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांनी ही
अभिनव व पर्यावरणपूरक सजावट साकारली. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा उपयोग
करून नैसर्गिक घटकांपासून केलेली सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
गणेशोत्सवाच्या
माध्यमातून ‘निसर्गाचे जतन,
पर्यावरणाचे संवर्धन आणि शाश्वत जीवनशैली’ याचा संदेश
विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्या वतीने
करण्यात आला. उत्सवाची सांगता पर्यावरणपूरक पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये
पर्यावरणाविषयीची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली.





.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)



