पंडित दीनदयाळ
उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
येथे शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.००
वाजता विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. त्यांनी
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन
केले.
यावेळी कुलसचिव श्री.
पुरभा काळे, नियंत्रक
श्रीमती भाग्यश्री जाधव आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.
प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपकुलसचिव
(सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी पंडित दीनदयाळ
उपाध्याय यांच्या जीवनकार्याची व राष्ट्रसेवेतील योगदानाची माहिती उपस्थितांना
दिली.
याप्रसंगी उपकुलसचिव
(विद्या) डॉ. गजानन भालेराव,
सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे यांच्यासह
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ
प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.



.jpeg)