Wednesday, March 16, 2016

वनामकृवित पीक व्यावस्थापन व हुमणी व्यवस्थापनावर प्रशिक्षण कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत शेतकरी व कृषि विभाग कर्मचारी यांचे करीता एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र येथे दि.१७ मार्च रोजी करण्‍यात आले आहे. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात कोरडवाहू शेती व्‍यवस्‍थापन, बीटी कापुस लागवड, कमी खर्चाचे लागवड तंत्रज्ञान, सद्य परिस्थितीतील शेतक-यांसमोरील प्रमुख समस्‍या व हुमणी व्‍यवस्‍थापन या विषयावर सविस्‍तर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. सदय टंचाई परिस्थितीत कमी पाण्‍यात येणा-या हंगामातील पीक व्‍यवस्‍थापन व शेतीचे नियोजन याविषयी शेतक-यांना निश्‍चतच फायदा होणार असुन सदरील प्रशिक्षणाचा शेतक-यांनी फायदा घ्‍यावा, असे आवाहन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले आहे. प्रशिक्षणात शेतक-यांना 'शाश्‍वत पीक व्‍यवस्‍थापन तंत्र' या मार्गदर्शक पुस्‍तीकेचे वाटप करण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्‍यासाठी शेतक-यांनी डॉ.यु.एन.आळसे (७५८८०८२१३७) व प्रा.डी.डी.पटाईत (७५८८०८२०४०) यांचेशी संपर्क साधावा.

Friday, March 11, 2016

बचत गट समुहांनी कंपन्या स्थापन करून सक्षम बनावे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्‍त शेतकरी महिला मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागाचा आत्‍मा प्रकल्‍प यांचे संयुक्‍त वतीने दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्‍त शेतकरी महिला मेळाव्‍याचे आयोजन औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्रात करण्‍यात आले होते. मेळावे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले, तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन विभागीय आयुक्‍त मा डॉ उमाकांत दांगट हे उपस्थित होते. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले,  डॉ प्रजा तल्‍हार, प्रा विजया नलावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कर्नाटक, गुजराज, तेलंगण राज्‍यात गेली 25 वर्षापुर्वीच बचत गटांची स्‍थापन होऊन या बचत गटांचा समुह संगणकाशी जोडुन वाटचाल करत आहेत. बचत गट निर्मीत मालाची बाजारात मोठी मागणी आली तरी ती पुर्ण करण्‍याची क्षमता महाराष्‍ट्रातही बचत गटांनी निर्माण करायला हवी, त्‍यासाठी अनेक बचत गट समुहाची एक कंपनी कार्यान्वित व्‍हावी, ही काळाची गरज आहे. बचत गटांच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण अर्थकारण सुधारण्‍याची ताकद महिलांमध्‍ये असुन यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्‍त मा डॉ उमाकांत दांगट यांनी आपल्‍या भाषणात केले. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात विद्यापीठाच्‍या उमेद अभियानाचे उदिष्‍ट सांगुन दुष्‍काळ परिस्थितीत देखील महिलांनी घरच्‍यांचा मनोबल वाढविण्‍याचे कार्य करण्‍याचा सल्‍ला दिला.

मेहनत म्‍हणजे नफा व दुर्लक्ष म्‍हणजे तोटा हा मुलमंत्र डॉ प्रजा तल्‍हार यांनी दिला तर घराचे घरपण टिकवुन गृहलक्ष्‍मी ही धनलक्ष्‍मी व्‍हावी, यासाठी प्रयत्‍न करा, असे आवाहन प्रा विजया नलावडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्‍वयक डॉ एस बी पवार यांनी केले. सुत्रसंचालन प्रा दिप्‍ती पाटगांवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा गीता यादव यांनी केले. कार्यक्रमास महिला शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. यावेळी महिला बचत गटांच्‍या विविध पदार्थाच्‍या समावेश असलेल्‍या प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते.  


Thursday, March 10, 2016

तेलबिया उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

वनामकृवितील अखिल भारतीय समन्‍वय करडई संशोधन प्रकल्‍प व हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तेलबिया विकास कार्यक्रमांतर्गत तेलबिया उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Wednesday, March 9, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


टिप - सदरील बातमी प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्त

Friday, March 4, 2016

वनामकृवितील सहाय्यक नियंत्रक श्री दिवाकर काकडे सेवानिवृत्त

वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाचे सहाय्यक नियंत्रक श्री दिवाकर काकडे दिनांक २९ फेब्रुवारी रोजी प्रदिर्घ विद्यापीठ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांनी विद्यापीठात निम्नस्तर शिक्षण विद्याशाखा, कृषि महाविद्यालय, उस्मानाबाद व कृषि महाविद्यालय, परभणी येथे विविध पदावर कार्य केले. त्‍यांचा सेवानिवृत्तनिमीत्य परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने आयोजित सेवागौरव कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, माजी प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यावरांनी श्री काकडे यांच्या ३६ वर्षातील सेवा कालावधीतील केलेल्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले तर श्री काकडे यांनी सत्काराला उत्तर देतांना आपण विद्यापीठामुळेच मोठे झालो असुन आभार मानण्यापेक्षा सदैव विद्यापीठाचे ऋणात राहील असे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री पी. पी. कदम, कृष्णा जावळे, सुभाष जगताप, एकनाथ घ्यार, श्रीमती दिपाली सवंडकर आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, March 2, 2016

वनामकृविचे अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्पर्धेमध्ये नेत्रदिपक यश

वनामकृविच्‍या संघाने सर्वसाधारण उपविजेतेपदासह पटकावीले तीन सुवर्ण, दोन रौप्‍य व दोन कांस्‍य पदके
बेंगलोंर येथे आयोजित अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्पर्धेमध्ये वनामकृविचा पदके प्राप्‍त संघासोबत विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, संघ व्यवस्थापक डॉ आशा देशमुख, प्रा. डि. एफ. राठोड आदी
**********************
कोंईबतुर येथील तामीळनाडू कृषि विद्यापीठात २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ३९ विद्यार्थ्यानी विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेमध्ये वनामकृविच्या हॉलीबॉल मुलींच्या संघाने चुरशीच्या सामन्यात बँगलोर कृषि विद्यापीठाच्या संघाचा पराभव करत सुवर्ण पदक मिळविले तर ॲथेलेटीक्स क्रिडा प्रकारात वनामकृविच्या संघास दोन सुवर्ण, दोन रौप्‍य व दोन कांस्‍य पदके प्राप्‍त केली. स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद बँगलोर कृषि विद्यापीठाने पटकावीले तर उपविजतेपद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या संघाने पटकावीले. विद्यापीठ संघाच्या या उत्कृष्ट प्रदर्शनाबददल कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्वरलु, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी अभिनंदन केले. सदर संघाचे संघ व्यवस्थापक म्हणुन डॉ आशा देशमुख, प्रा. डि. एफ. राठोड व प्रा. एस. यु. चव्हाण यांनी काम पाहिले.